० महाराष्ट्र विशेष :

    •महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग?- शंभू महादेव डोंगर रांग
    •नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकमेव उपनदी ?- तवा
    •महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते?- ज्वारी
    •महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?- जायकवाडी
    •महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?- शेकरू (रतुफा इंडिका)
    •महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?- हरियाल (ट्रेरॉन फिनिकोप्टेरा)
    •महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू कोणते?- ब्लु मॉरमॉन
    •महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणते?- आंबा (मँगीफेरा इंडिका)
    •महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?- जारूल/मोठा बोंडारा (लॅजेरस्ट्रोमिया फ्लॅस-रेगिनी)
    •महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?- नाशिक (१२ वर्षांनी)
    •महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?- अहमदनगर
    •महाराष्ट्रातील बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे?- बेसाल्ट
    •मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते?- औरंगाबाद
    •महाराष्ट्रात कोणत्या जिल्हयात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?- चंद्रपूर
    •कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे?- आर्वी (पुणे)
    •महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे?- विदर्भ
    •सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?- अहमदनगर
    •नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?- गोंदिया
    •महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्र असणारा जिल्हा कोणता?- गडचिरोली
    •महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो?- नैऋत्य मोसमी
    •महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?- सातारा
    •महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?- १ मे १९६०
    •ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे?- चंद्रपूर
    •गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते?- त्र्यंबकेश्वर
    •नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?- अकोला
    •ऊसतोडी कामगारांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यास म्हणतात?- बीड
    •महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता?- मुंबई
    •धुळे शहर कोणत्या नदिकाठी वसलेले आहे?- पांझरा
    •मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा देशातील कितवा क्रमांक आहे?- तिसरा
    •पांढरे सोने पिकविणारा जिल्हा?- यवतमाळ
    •महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते?- कोयना
    •दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
    •तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?- उस्मानाबाद
    •मुंबई-पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव काय?- सिंहगड
    •जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?- गोदावरी
    •महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे ?- वर्धा
    •समाजसुधारक आण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?- अहमदनगर
    •हिमरू शालीकरीता प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?- औरंगाबाद
    •महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते?- रायगड
    •महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे किती?- ७२० कि.मी.
    •महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे किती?- ८६० कि.मी.
    •अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे?- वेरूळ (औरंगाबाद)
    •महाराष्ट्रातील औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता?- गडचिरोली
    •शुन्यधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते?- महाराष्ट्र
    •पंचायतराज स्विकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे?- ९ वे राज्य
    •महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?- नाशिक
    •महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात?- हिवाळा
    •महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?- गोदावरी

टिप्पण्या