⋇ १९१५ चा फसलेला उठाव :
− २१ फेब्रुवारी १९१५ रोजी रासबिहारी घोष, सचिंद्रनाथ सन्याल, विष्णू गणेश पिंगळे, बागी करतारसिंग यांनी गदर या क्रांतिकारी संघटनेमार्फत लाहोर, बनारस, पंजाब, मिरत या ठिकाणी उठाव करण्याचे ठरविले.
− परंतू, किरपालसिंग या घरभेद्याने ब्रिटिशांना उठावाची माहिती दिल्याने २१ फेब्रुवारीचा हा उठाव पुर्णपणे फसला.
− रासबिहारी घोष जपानला पळून जाऊन, जपान येथे 'इंडियन नॅशनल आर्मीची' स्थापना केली.
⋇ श्यामजी कृष्ण वर्मा :
− श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे ‘इंडिया हाऊस' (भारत भवन) ची स्थापना केली.
− भारतातील राष्ट्रवादी तरूणांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी 'शिवाजी शिष्यवृत्ती' सुरू केली व तिच्या मदतीने सावरकर इंग्लडला गेले होते.
− शिष्यवृतीच्या निमित्ताने देशभक्त तरुणांना एकत्र करुन राष्ट्रवादी गट तयार करणे हा उद्देश होता.
− इंडिया हाऊस हे सावरकर, मदनलाल धिंग्रा, सरदार सिंग राणा यासारख्या क्रांतिकारकाचे केंद्र होते.
− श्यामजी कृर्ण वर्माच्या अनुपस्थितीत लंडन येथील कंद्र स्वा. सावरकरांनी सांभाळले.
− इंडिया हाऊस मधील मदनलाल धिंग्रा याने जुलै − १९०९ मध्ये कर्झ वायलीवर गोळ्या झाडल्या.
− The Indian Socialogist हे वृत्तपत्र इंग्लंड मध्ये सुरू करून श्यामजींनी भारतीयांवरील अन्यायास वाचा फोडली.
− इंग्लंडमध्ये पोलिसांचा त्रास होऊ लागल्याने श्यामजींनी पॅरिस मध्ये शेवटी जिनिव्हा येथे आश्रम घेतला व १९३० साली जिनिव्हा येथे त्यांचे निधन झाले.
⋇ गदर पार्टी : १९१३
− लाला हरदयाल यांनी १९१३ मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रेंन्सिस्को येथे गदर पार्टीची स्थापना केली.
− कॅनडा येथेही गदर संघटनेच्या शाखा होत्या. परदेशातील भारतीय लोकांमध्ये पारतंत्र्याविरूद्धची भावना चेतविण्याचे कार्य १९११ च्या 'गदर' वृत्तपत्राने केले.
− महाराष्ट्र आणि बंगालप्रमाणे पंजाब मध्ये क्रांतिकार्य होते.
− पंजाब मध्ये गुप्त क्रांतिकारी संघटना लाला हरदयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असे. या कार्यामागे लाला लजपतराय यांचा आशीर्वाद होता.
− १९११ मध्ये लाला हरदयाळ अमेरिकेला गेल्यावर पंजाब मधील त्यांचे कार्य रासबिहारी घोष यांनी चालविले.
− दक्षिण भारतात पाँडेचेरी तर उत्तर प्रदेशात वाराणसी येथे क्रांतिकारकांची महत्वाची केंद्र होती.
⋇ काकोरी कट : ९ ऑगस्ट १९२५
− काकोरी कटात चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ, अशफाकउल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र राहीरी इत्यादी क्रांतीकारकांचा समावेश होता.
− क्रांती कार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना ९ ऑगस्ट १९२५ रोजी उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्टेशनजवळ लुटला.
− अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहीरी, रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंग यांना पकडून फाशी देण्यात आली. अशफाकउल्ला खान हा फासावर जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक ठरला.
− चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली हिंदूस्तान सोशियालिस्ट रिपब्लिकन आर्मी'ची स्थापना करण्यात आली.
− २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद मधील आल्फ्रेड पार्क येथे चंद्रशेखर आझादांना इंग्रजांनी घेरले असता त्यांनी स्वतःवर गोळी झाडून हुतात्म स्विकारले.
− चंद्रशेखर आझादानंतर हिंदूस्तान सोशियालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे नेतृत्व यशपालसिंग यांनी केले.
⋇ साम्यवादी पक्ष = १९२५
− भारतातील नवोदित कामगार चळवळीत काम करणाऱ्या मार्क्सवादी विचारांच्या तरुणांनी १९२५ साली कानपूर येथे गुप्तपणे 'भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना केली.
− नवोदित कामगार चळवळीत काम करणारे श्रीपाद अमृत डांगे, घाटे के.एन. जोगळेकर, मिरजकर, मुजफ्फर अहमद इ. तरुण होते.
− आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीचा एक भाग म्हणून भारतीय साम्यवादी कार्यकर्ते देशात काम करु लागले.
− भारतातील लढाऊ कामगार चळवळीचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने २० मार्च १९२९ रोजी देशभर प्रमुख नेत्यांना अटक कली व राजद्रोहाचा खटला भरला.
− हा खटला 'मिरत कट' या नावाने प्रसिद्ध आहे.
− म. गांधीच्या नेतृत्वाखाली चाललेल्या देशव्यापी स्वातंत्र्य चळवळीची साम्यवादी पक्षाने 'भांडवलदारांची चळवळ' अशी संभावना केली.
⋇ स्वातंत्र्यवीर सावरकर
− स्वा. सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी 'भगूर' (नाशिक) या ठिकाणी झाला.
− एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात दुष्काळ व प्लेगने संपूर्ण महाराष्ट्राला भयभीत करुन सोडले.
− ती ब्रिटिश अधिकाऱ्याच्या दडपशाहीने प्लेगचा रोगी लपवून ठेवला जातो या कारणाखाली सरकारी कर्मचारी घराघरात घूसुन शोधकार्य करत असत या मधून स्त्रियाही सुटल्या नाही.
− देवघरात घुसून जनतेच्या धार्मिक भावनाही दुखावल्या गेल्या ब्रिटिशांची ही खबरदारी म्हणजे रोगापेक्षा औषध जालीम असा प्रकार केला.
− अशा परिस्थितीत २२ जून १८९७ रोजी पुण्याचे प्लेग कमिश्नर रॅड व आयर्स्ट यांचे खून झाले.
− खुनाबद्दल दामोदर बाळकृष्ण व वासुदेव या चाफेकर बंधूंना सरकारने फासावर लटकवले.
− या घटनेपासून स्फूर्ती घेऊन विनायक दामोदर सावरकर यांनी १९०० मध्ये नाशिक येथे 'मित्रमेळा' नावाची संस्था स्थापन केली.
− मित्रमेळा या संस्थेचेच १९०४ मध्ये 'अभिनव भारत' असे नाव ठेवले.
− 'शस्त्राशिवाय स्वातंत्र्य नाही' अशी सावरकरांची विचारधारा होती.
− इटलीचा देशभक्त स्वातंत्र्यवीर मॅझिनी यांच्या चरित्राचा मराठीत अनुवाद सावरकरांनी केला.
− मॉझिनीचे आदर्श भारतीयांसमोर ठेवावे म्हणजे त्यातून देशकार्याची प्रेरणा मिळेल. असा त्यामागे सावरकरांचा उद्देश होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा