−  १९०६ मध्ये सावरकर इंग्लंडला गेले व तेथून भारतातील क्रांतिकारकांना गुप्तपणे पिस्तूले, काडतूसे पुरवू लागले.
−  सावरकरांच्या अनुपस्थितीत अभिनव भारत संघटनेचे कार्य त्यांचे वडील बंधू गणेशपंत सावरकर यांनी बघितले. (बाबाराव)
−  सावरकरांच्या संघर्षाला −  १९०७ मध्ये ५० वर्ष पूर्ण झाली तेव्हा “हा संघर्ष म्हणजे भारतीय स्वांतत्र्य संग्राम होय” असे प्रतिपादन सावरकरांनी केले.
−  १९०८ मध्ये लंडन येथे सावरकर यांच्याकडे आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करून त्यांना अटक केली.
−  भारतात घेऊन येणारे जहाज फ्रान्सच्या 'मर्सेलिस' बंदरात येताच सावरकरांनी सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केला.
−  भारतात आल्यावर 'नाशिक खटल्या बाबत’ त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
−  अभिनव भारताच्या अनंत कान्हेरे सदस्याने नाशिक चे कलेक्टर जॅक्सन यांचा वध १९०९ मध्ये केला.
−  नाशिक खटल्यात अनंत कान्हेरे, कर्वे व देशपांडे या नाशिकच्या क्रांतिकारकांना फाशिची शिक्षा देण्यात आली.
−  शिक्षा भोगण्यासाठी सावरकरांची रवानगी अंदमानाच्या प्रसिद्ध सेल्यूलर तुरुंगात करण्यात आली.“पन्नास वर्षे शिक्षा भोगण्याइतका तू जगशील का ? असा सवाल विचारणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्याला सावरकरांनी बाणेदार उत्तर दिले. “तोवर ब्रिटिश साम्राज्य तरी टिकेल का ?
⋇ भारतीय नौसेनेचा उठाव : फेब्रू − १९४६
−  आझाद हिंद सेनेच्या लढ्यातून प्रेरणा घेऊन भारतीय सेनेच्या तिन दलामध्ये उठाव झाले.
−  १८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबई येथे ‘तलवार' या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांनी उठाव केला.
−  'तलवार' युद्ध नौकेवरील बी.सी. दत्त या सैनिकाने 'छोडो भारत', 'जयहिंद' या घोषणा दिल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली.
−  मुंबई मध्ये बी. सी. दत्त, एम. एस. खान आणि मदन यांनी बंडाचे नेतृत्व केले.
−  कराची येथे 'हिंदुस्थान' या युद्धनौकेवरील सैनिकांनी उठाव केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हस्तक्षेप करून नाविकांचा उठाव शांत केला.
⋇ मुस्लीम लीगची स्थापना = ३० डिसेंबर १९०६
−  १ ऑक्टोबर १९०६ रोजी ३५ सदस्यीय मुस्लीम शिष्टमंडळ प्रिन्स आगाखान यांच्या नेतृत्वाखाली व्हाईसराय लॉर्ड मिंटो यांना भेटले.
−  मुसलमानांचा स्वतंत्र राजकीय पक्ष असावा अशी कल्पना नवाब सलीमउल्ला यांनी मांडली.
−  लॉर्ड मिंटो यांच्या सहकार्याने ३० डिसेंबर १९०६ रोजी 'मुस्लीम लीग' ची स्थापना ढाका येथे करण्यात आली.
−  मुस्लीम लीगच्या संस्थापकामध्ये आगाखान हे धर्मगुरु, मोहसीन उलमुल्क नवाब सलीमउल्ला इ. समावेश होता.
−  भारतातील ब्रिटिश धार्जिण्या अशा अँग्लोइंडियन वृत्तपत्रांनी मात्र या घटनेचे स्वागत करुन “मुस्लीम लीग म्हणजे लोकप्रिय बनत चालेल्या राष्ट्रीय सभेवरील उतारा होय” असे मत व्यक्त केले.
−  १९३० साली डॉ. महंमद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार मांडला.
−  रहमत अली चौधरी याने आपल्या 'नाऊ ऑर नेव्हर' या पुस्तकात स्वतंत्र राष्ट्रास ‘पाकिस्तान' असे नाव सूचविले.
−  बॅ. अहमद अली जीना यांनी द्विराष्ट सिद्धांत मांडून पकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी केली.
⋇  चितगाव कट : १८ एप्रिल १९३०
−  चितगाव कटामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता.
−  १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी बंगालमधील चितगाव पुलिस सहस्त्रगारावर हल्ला करून लुटला.
−  चितगाव कटात सूर्य सेन यांच्या नेतृत्वाखाली अनंतसिंग, गणेश घोष, तारकेश्वर दस्तीदार, अजय घोष, कल्पना दत्त, प्रितीलता वड्डेदार, अंबिका चक्रवती इ. महिलांचा समावेश होता.
−  चितगाव कटामुळे बंगालमधील क्रांतीकार्यास प्रोत्साहन मिळाले.
−  शांती घोष व सुनीता चौधरी या शाळकरी मुलींनी १४ डिसेंबर १९३१ रोजी केमिल्लाचा जिल्हा न्यायधीश मि. स्टिवन्स यांचा वध केला.
−  बीना दास या युवतीने ६ फेब्रुवारी १९३२ रोजी कोलकाता विद्यापीठ पदवीदान समारंभात बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.

भारतातील व्हाईसरॉय


⋇ लॉर्ड कॅनिंग : १८५८ − १८६२
−  १८५६ − १८५८ दरम्यान गव्हर्नर जनरल.
−  भारताचा पहिला व्हाईसराय. (१८५८ ते १८६२)
−  १८५७ चा उठाव मोडून काढला. खालसा धोरण रद्द केले.
−  १८५६ − ५७ आय.सी.एस. परीक्षा भारतात घेण्यास सुरुवात केली.
−  १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली.
−  १८६० मध्ये आग्रा व लाहोर येथे दरबार भरवून संस्थानिकांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली
−  १८३६ मध्ये लॉर्ड मेकॉले ने तयार केलेल्या 'इंडियन पिनल कोड'ला १८६० मध्ये कॅनिंगने मान्यता दिली.
−  १८६१ च्या 'इंडियन हायकोर्ट अॅक्ट' नुसार मुंबई, मद्रास, कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली.
−  १८६१ चा कौन्सिल ॲक्ट संमत केला.
−  कॅनिंगने कोलकाता − अहमदाबाद लोहमार्ग १८६१ मध्ये सुरू केला.
−  कॅनिंगच्या कार्यकाळात भारतीयांना 'सर' ही पदवी देण्यास सुरूवात केली.
⋇ लॉर्ड एल्गिन पहिला : १८६२ − ६३
−  लॉर्ड एल्गिन हा सहिष्णु धोरणाचा पुरस्कर्ता होता.
−  हिमाचल प्रदेशात धर्मशाळा येथे एल्गिनचा मृत्यू झाला.
⋇ सर जॉन लॉरेन्स : १८६४ − १८६९
−  शेतकऱ्यांच्या हितासाठी पंजाब आणि अवध येथे 'टेनन्सी अॅक्ट' पास केले.
−  १८६८ मध्ये फॅमिन कमिशन (दुष्काळ आयोग) ची स्थापना केली.
−  जलसिंचन खाते निर्माण करून त्यावर रिचर्ड स्टॅची या तज्ञाची नियुक्ती केली.
−  सिमला येथे उपराजधानीचे ठिकाण निर्माण केले.

टिप्पण्या