⋇ लॉर्ड मेयो : १८६९ − १८७२
−  आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
−  १४ डिसेंबर १८७० रोजी आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले.
−  १८७१ मध्ये भारताची पहिली जनगणना केली.
−  वहाबी चळवळ, कुका चळवळ मेयोच्या कार्यकाळात क्रियाशील झाल्या.
⋇ कुका चळवळ
−  कुका चळवळ पंजाब मध्ये रामसिंह कुका यांनी चालविले
−  ब्रिटिशांच्या दडपशाहीची चीड येऊन रामसिंह कुकांनी लष्करी नोकरी सोडून दिली आणि एका धार्मिक संप्रदायाची स्थापना केली.
−  ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कार्य करायचे असल्याने रामसिंह कुकांची ‘कुका चळवळ' अतिशय गुप्तपणे सुरू होते.
−  रामसिंह कुकांच्या अनुयायांना मृत्यूदंड देण्यात आला आणि रामसिंह कुकांना ब्रम्हदेशात हद्दपार करण्यात आले.
−  देशाचे संख्यांकिय सर्वेक्षण करून कृषी खाते केले.
⋇ लॉर्ड नार्थब्रुक : १८७२ − १८७६
−  १८७५ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या राजकुमाराची भारतभेट झाली होती.
⋇ लॉर्ड लिटन : १८७६ − १८८०
−  लिटनने १८७६ − १८७८ च्या दुष्काळावर उपाय सुचविण्यासाठी रिचर्ड स्ट्रेची या तज्ञाची नियुक्ती केली होती.
−  १ जानेवारी १८७७ रोजी दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास ‘भारताची सम्राज्ञी' (कैसर − ए − हिंद) ही पदवी दिली.
−  मार्च १८७८ ला व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट (देशी वृत्तपत्र कायदा) संप केला.
−  १८७८ च्या शस्त्रबंदी कायद्यानुसार विना परवानगी शस्त्रे बाळण्यास भारतीयांवर बंदी घातली.
−  १८७९ चा ‘स्ट्रॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिसेस अॅक्ट पास करून आय.सी, एस परीक्षेची कमाल वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे केली.
−  मिठाच्या व्यापारावर जाचक कर लादले.
⋇  लॉर्ड रिपन : १८८०− १८८४
−  स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक.
−  मानवतावादी दृष्टिकोन व भारता बद्दलची आस्था. यामुळे रिपनला भारतात लोकप्रियता लाभली.
−  रिपनने १८८१ मध्ये म्हैसूर, बडोदा या राज्यांची पुर्नस्थापना केली.
−  १८८१ चा फॅक्टरी अॅक्ट पास करून ७ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घातली.
−  १९ जानेवारी १८८२ रोजी रिपनने 'व्हर्नाकुलर प्रेस अॅक्ट' रद्द केला. १८८२ ला विल्यम हंटर कमिशन नेमले.
−  १८ मे १८८२ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पास केला.
−  रिपनच्याच कारकिर्दीत राव व रावबहादूर अशा पदव्या देण्यास सुरूवात झाली.
−  २ फेब्रुवारी १८८३ रोजी इल्बर्ट विधेयक मंजूर करून भारतीय न्यायाधिशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार मिळाला.
−  रमेशचंद्र मित्तर यांची कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधिशपदी नियुक्ती केली आणि मुख्य न्यायधिशपदी नियुक्ती होणारे ते पहिले भारतीय न्यायाधिश होते.
−  आय.सी.एस. परीक्षेची कमाल वयोमर्यादा १९ वरून पुन्हा २१ वर्षे केली.
⋇ लॉर्ड डफरिन : १८८४ − १८८८
−  २८ डिसेंबर १८८५ रोजी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली.
−  १८८६ मध्ये चार्ल्स अचिसन यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली.
−  १८८७ चा ‘पंजाब कुळ कायदा' पास केला.
−  १६ फेब्रुवारी १८८७ रोजी व्हिक्टोरिया राणीच्या राज्य रोहणाच्या ५० व्या वर्धापनदिनाचे आयोजन केले.
−  लॉर्ड डफरिन यांच्या पत्नीने भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी 'लेडी डफरिन फंड' स्थापन केला.
⋇  लॉर्ड लान्स डाऊन : १८८८ − १८९४
−  १८९२ चा कौन्सिल अॅक्ट पास केला.
−  समतीवय कायद्यानुसार १२ वर्षाखालील मुलींचे विवाह बेकायदेशिर ठरविण्यात आले.
−  भारत − अफगाणिस्तान दरम्यानची ड्यूरँड सीमारेषा आखली.
−  लिटन ने सुरू केलेली स्टॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिसेस अॅक्ट लॉन्स डाऊनने बंद केली.
⋇ लॉर्ड एल्गिन दुसरा :
−  १८९६ − १८९७ या काळात महाराष्ट्रात प्लेगची साथ पसरली.
−  १८९९ मध्ये बिहारमध्ये संथाळ्यांनी उठाव केला.
⋇  लॉर्ड कर्झन : १८९९ − १९०५
−  कर्झनच्या कारकिर्दीत भारतात सर्वाधिक रेल्वेमार्गाची निर्मिती झाली.
−  कर्झनने १८९९ ला भारतीय चलन कायदा पास केला.
−  १९०० मध्ये कर्झनने कोलकाता महापालिका विधेयक मंजूर करून स्थानिक स्वराज्य संस्थेवर नियंत्रणे लादली.
−  १९०० मध्ये लॉर्ड मॅक्डोनॉल्डच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला.
−  १९०१ मध्ये सिमला येथे शिक्षण परिषद भरवली.
−  १९०१ ला रॉयल नेव्हीची स्थापना केली.
−  १९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती केली.
−  १९०१ मध्ये संस्थानिकांच्या मुलांना लष्करीशिक्षणासाठी इंपिरिअल कॅडेट कोअर ची स्थापना केली.
−  १९०२ मध्ये अॅण्ड्यू फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस सेवेतील दोष शोधण्यासाठी समिती नेमली.
−  १९०४ मध्ये विद्यापीठ कायदा पास करून उच्चशिक्षण पध्दतीवर निर्बंध लादले.
−  या विद्यापीठ कायद्याशी संबंधित 'रॅले आयोग' होता.
−  १९०४ मध्ये भारतातील पहिला सहकारी पतपेढीविषयक कायदा संमत केला.
−  १९०४ मधिल भारतातील प्राचीन स्मारकांचा सरंक्षण कायदा पास केला.
−  बंगालची अन्यायी फाळणी १९०५ ला कर्झननेच केली.
−  कर्झनने लष्करी अधिकाऱ्यासाठी क्वेट्टा येथे प्रशिक्षण केंद्र उभारले.
−  लष्करी सेनापती किचनेरशी वाद व त्यावरून कर्झनने राजीनामा दिला होता.
−  ब्रिटिश व्हाईसराय लॉर्ड कर्झन ने असे लिहिले की “ भारत हा आपल्या साम्राज्याचा केंद्रबिंदू आहे आपल्या वसाहतील दुसरी एखादी वसाहत गमावली तर आपले साम्राज्य चालू राहिल; परंतु भारत गमावला तर मात्र आपल्या साम्राज्याचा सुर्य मावळलेला असेल"
−  राष्ट्रीय सभेचा झपाट्याने न्हास होत असून तिला शांतपणे गाडून टाकणे ही माझी सर्वात मोठी महत्वाकांक्षा आहे असे लॉर्ड कर्झन ने म्हटले.

टिप्पण्या