⋇  लॉर्ड मिंटो (१९०६ − १९१०)
−  १९०६ मुस्लीम लीगची स्थापना
−  १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा व यानुसारच मुस्लीमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.
⋇  लॉर्ड हार्डिग्ज् दुसरा (१९१० − १९१६)
−  १९११ भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलविली.
−  १९११ ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज यांची भारत भेट : दिल्ली दरबार
−  याच दिल्ली दरबारात पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.
⋇  लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ − २१)
−  १९१९ रौलेट कायदा संमत केला १३ एप्रिल १९१९ रौलेट कायद्याच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर जनरल डायरने गोळीबार केला.
−  १९१९ माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा संमत केला.
−  १९२० गांधीजींची असहकार चळवळ.
⋇  लॉर्ड रिडींग (१९२१ − २६)
−  ५ फेब्रुवारी १९२२ चौरी − चौरा हत्याकांडामुळे गांधीजींची असहकार चळवळ स्थगित
−  प्रिन्स ऑफ वेल्सची भारत भेट
−  १९२३ स्वराज्य पक्षाची स्थापना
−  १९२५ राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना नागपूर येथे डॉ. हेडगेवार यांनी केली
⋇  लॉर्ड आयर्विन (१९२६ − ३१)
−  १९२७ सायमन कमिशनची स्थापना
−  १९२८ सायमन कमिशनच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्ध्यात लाहोर येथे लाला लजपयतराय यांच्या लाठीहल्ल्यात मृत्यू.
−  ऑगस्ट १९२८ ‘नेहरु रिपोर्ट' पंडित मोतीलाल नेहरुनी मांडला
−  १९२८ नेहरू रिपोर्टच्या विरोधात बॅ. जिनांचे प्रसिद्ध १४ मुद्दे.
−  १९२९ संपूर्ण स्वराज्याची मागणी.
−  १९३० लंडन येथे पहिली गोलमेज परिषद
−  ५ मार्च १९३१ गांधी आयर्विन करार
⋇  लॉर्ड विलिंग्डन (१९३१ − १९३६)
−  १९३१ ची दुसरी व १९३२ ची तिसरी गोलमेज परिषद लंडन येथे घेण्यात आली.
−  १६ ऑगस्ट १९३२ रॅम्से मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा; त्यानुसार अस्पृश्यांसाठी वेगळ्या मतदार संघांची घोषणा.
−  १९३२ महात्मा गांधींचे येरवडा कारागृहात उपोषण सुरू
−  २५ सप्टेंबर १९३२ गांधी − आंबेडकर यांच्यात पुणे करार/ऐक्य करार झाला.
−  १९३५ चा भारत सरकार विषयक कायदा समंत
−  १९३५ ब्रम्हदेश भारतापासून वेगळा.
⋇  लॉर्ड लिनलिथगो (१९३६ − १९४४)
−  १९३७ भारतात प्रांतिक निवडणुका; ८ प्रांतात काँग्रेसची सरकारे.
−  १ सप्टे. १९३९ दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात.
−  ऑक्टो. १९३९ प्रांतिक मंत्रीमंडळांचे राजीनामे. ८ ऑगस्ट १९४२ 'चले जाव' ठराव संमत.
⋇  लॉर्ड वेव्हेल (१९४४ ते मार्च १९४७)
−  १९४५ सिमला परिषदेत वेव्हेल योजना मांडली. भारतीयांनी ती नाकारली.
−  १९४५ इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेवर; लॉर्ड ॲटली हे इंग्लंडचे पंतप्रधान बनले.
−  १९४६ त्रिमंत्री योजना (कॅबिनेट मिशन)
−  २ सप्टें १९४६ पं. नेहरूंच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकारची स्थापना.
−  ९ डिसेंबर १९४६ घटना परिषदेचे पहिले अधिवेशन दिल्लीत सुरु.
⋇  लॉर्ड माऊंटबॅटन (१९४७ स्वातंत्रपूर्व कारकीर्द)
−  ३ जून १९४७ माऊंटबॅटन योजना घोषित; त्यानुसार भारत आणि पाकिस्तान ही दोन नवीन राष्ट्र निर्माण.
−  १८ जुलै १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत.
−  १५ ऑगस्ट १९४७ सुमारे दिडशे वर्षांच्या गुलामीच्या शृंखलांतून भारत स्वतंत्र
−  लॉर्ड माऊंटबॅटन हे ब्रिटीशकालीन भारताचे शेवटचे व्हॉईस राय तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरले.

स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल (१९४७− ५०)


१) लार्ड माऊंटबॅटन
−  कार्यकाल : १५ ऑगस्ट १९४७ ते २१ जून १९४८
−  स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल.
−  भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय.
−  माऊंटबॅटन योजनेमुळे (३ जून १९४७) भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे उदयास आली.
२) चक्रवर्ती राजगोपालाची (सी. राजाजी)
−  कार्यकाल : २१ जून १९४८ ते २६ जानेवारी १९५०
−  स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल.
−  स्वतंत्र भारातचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल
−  'राजाजी योजना' मुस्लीम लीगने फेटाळली.

संस्थानाचे विलिनीकरण


−  स्वातंत्र्यावेळी भारतात सुमारे सहाशेवर संस्थाने होती. भारतीय एकात्मतेला हे मोठे आव्हान होते.
−  भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांच्या विलीनीकरणात सिंहाचा वाटा उचलला
सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य : संस्थानांच्या विलीनीकरणा संदर्भात भारत सरकारने केलेल्या करारानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना भारतात सामील होण्याचे आवाहन केले.
−  संस्थानी प्रजेची राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याची इच्छा असल्याचे निदर्शनास अणून त्यांनी संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र न ठेवण्याबद्दल बजावले.
−  परिणामी काळाची पावले ओळखून बहुसंख्य संस्थाने भारतीय संघराज्यात सामील झाली.
−  अपवाद होता तो जुनागढ, हैद्राबाद व काश्मीर या तीन संस्थानांचा
−  २१ नोव्हेंबर १९४७ रोजी सरदार पटेल यांनी घटना समितीमध्ये 'जैसे थे' करार सादर केला.याचा अर्थ संस्थानिकांचे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांशी जसे संबंध होते, तसेच संबंध स्वातंत्र्यानंतर भारत सरकारशी असावेत.

टिप्पण्या