मवाळ कालखंड/अर्ज विनंत्यांचा कालखंड/नेमस्तकालखंड : १८८५-१९०५
− मवाळ कालखंडात दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशहा मेहता, नामदार गोखले, रंगय्या नायडू, न्यायमूर्ती तेलंग, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बद्रुद्दीन तय्यबजी इत्यादी मवाळ नेत्यांचा समावेश होतो.
− मवाळ कालखंडात राष्ट्रीय सभेची एकूण २१ अधिवेशने संपन्न झाली.
दादाभाई नौरोजी
− 'भारताचे पितामह' म्हणून ज्यांचा इतिहासात गौरवाने उल्लेख केला जातो ते दादाभाई नौरोजी. गुजरात मधील नवसारीच्या पारशी कुटूंबात सप्टेंबर १८२५ रोजी जन्म झाला.
− दादाभाई हे 'भारतीय अर्थशास्त्राचे जनक' म्हणून ओळखले जातात. दादाभाईंची १८५३ मध्ये मुंबईच्या सुप्रसिध्द ‘एलफिस्टन कॉलेज'मध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणुक झाली व या कॉलेजमधील ते पहिले 'भारतीय प्राध्यापक' होते.
− दादाभाईंनी 'रास्त गोफ्तार' (खरी बातमी) हे फारशी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले.
− दादाभाई नौरोजींनी १८८६, १८९३, १९०६ असे तीन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविले.
− १८७३ मध्ये लुटीचा सिध्दांत, संपत्तीचे अपहरण हे सिध्दांत माडून शेतसारा कमी करावा, मिठावरील कर रद्द करावे, बँका सुरू कराव्यात, रयतेचे शिक्षण सुरू करावे इत्यादी आर्थिक मागण्या केल्या.
− १८९२-१८९५ या काळात इंग्लडमधील ‘फिन्सबरी' मतदार संघातून निवडुन येऊन 'हाऊस ऑफ कॉमन' चे सभासद बनले. दादाभाई नौरोजी ब्रिटिश पार्लमेंटवर निवडुन येणारे पहिले भारतीय सभासद ठरले.
− दादाभाई नौरोजी हे १८९६ च्या वेल्बी कमिशनचे सदस्य होते. वेल्बी कमिशन भारतातील आर्थिक सुधारणा संदर्भात नियुक्त केले होते.
− दादाभाईंनी १८६६ मध्ये लंडन येथे 'ईस्ट इंडिया असोसिएशन' ही संघटना स्थापन केली व तिची शाखा १८६९ मध्ये मुंबईत स्थापन केली.
− दादाभाईंनी १८८७ मध्ये इंग्लडमध्ये ‘इंडियन रिफॉर्स असोसिएशन' संस्था स्थापन केली.
− १९०६ च्या कोलकत्ता अधिवेशनात दादाभाईंनी स्वराज्य हेच काँग्रेस ध्येय घोषित केले.
− स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे हे लक्षात घेणे आवश्यक आहे
− वसाहतीचे स्वातंत्र्य व साम्राज्यांतर्गत स्वराज्य असेही स्वराज्यास म्हटले गेले.
− Poverty and Unbritish Rule in India' या ग्रंथात लुटीचा सिध्दांत मांडला.
− Drain of wealth दादाभाई नौरोजींनीच मांडला.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
− महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे १८ जानेवारी १८४२ रोजी झाला. रानडेचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरात तर उच्चशिक्षण मुंबई येथे पूर्ण झाले.
− न्या. रानडे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयाचे प्राध्यापक होते.
− प्रार्थना समाज व सार्वजनिक सभेच्या स्थापनेत न्या. रानडेंचा सहभाग होता.
− न्या. रानडेनी स्त्रियांच्या प्रश्नामुळे १८६५ मध्ये 'विधवा विवाहोत्तेजक मंडळ' स्थापन केले.
− १८८७ मध्ये रानडेनी 'भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली.
− भारताने उद्योगधंद्याच्या क्षेत्रात प्रगती करावी म्हणून पूणे येथे ‘भारतीय औद्योगिक परिषदेची' स्थापना १८९० मध्ये केली.
− भारतीय समाजात वाङ्मयाबद्दल गोडी निर्माण व्हावी म्हणून 'ग्रंथोत्तेजक सभा' स्थापन केली.
− १८९३ मध्ये रानडेंची मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. रानडे हे १८८५, १८९०, १८९३ यावर्षी मुंबई प्रांताच्या कायदेमंडळावर सदस्य होते.
− १८९६ ला रानडेंनी 'डेक्कन सभा' स्थापन केली. न्यायमूर्ती रानडेंनी ‘एकेश्वरनिष्ठांची कैफियत' हा निबंध प्रार्थना समाजाच्या प्रचारार्थ लिहिला.
− 'हिंदी अर्थशास्त्राचा पाया’ आणि ‘प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया' न्यायमूर्ती रानडेंनी घातला आहे.
− न्यायमूर्ती रानडेंचे गुरू न्यायमूर्ती तेलंग हे होते. गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरू न्या. रानडे होते.
फिरोजशहा मेहता:१८४५-१९१५
− 'मुंबईचा सिंह' व भारतातील सर्वोत्तम वादपटू म्हणून नावलौकिक असलेले फिरोजशहा मेहता यांचा जन्म मुंबईत ४ ऑगस्ट १८४५ रोजी एका व्यापारी कुटूंबात झाला.
− ब्रिटिश सरकारने मेहतांना 'नाईट कमांडर' ही पदवी देऊन गौरव केला होता.
− मेहतांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून एम.ए.ची पदवी संपादन कल्यावर त्यांनी ब्रिटनला जाऊन १८६७ मध्ये बॅरिस्टरची पदवी घेतली.
− मेहतांनी १८६९-१८७६ दरम्यान मुंबई हायकोर्टात वकीली केली. १८६९ ची दादाभाईंनी स्थापन केलेली ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई येथील शाखेचे फिरोजशहा चिटणीस होते.
− १८८४ मध्ये लॉर्ड रिपनने मांडलेल्या इल्बर्ट बिलाविरूद्ध युरोपियांनी आंदोलन सुरू केल्यावर भारतीय लोकांचा न्याय मागण्यासाठी फिरोजशहा मेहतांनी प्रतिआंदोलन सुरू केले.
− मेहता हे १८९० च्या राष्ट्रीय सभेच्या कोलकत्ता येथील सहाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. १९०४ च्या लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावर टीका करून विद्यापीठांच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरला.
− मेहतांनी १९१३ मध्ये बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केले.
− १९१५ मध्ये मेहता यांची मुंबईचे कुलगुरू म्हणून निवड झाली.
− १९१५ मध्ये त्यांचे निधन झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा