नामदार गोपाल कृष्ण गोखले


−  गोपाल कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कातलुक' येथे ९ मे १८६६ रोजी झाला.
−  गोखले हे इंग्रजी आणि गणित विषयात कायदे पंडित होते.
−  पुणे येथील सार्वजनिक सभेचे सचिवपद गोखले यांनी भूषविले.
−  राष्ट्रीय सभेमार्फत निघणाऱ्या त्रैमासिकाचे संपादन गोखले यांनी केले.
−  काही काळात त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून व नंतर प्राचार्य म्हणून काम केले.
−  १८९६ च्या वेल्बी कमिशनसमोर साक्ष देऊन गोखलेंनी भारताच्या आर्थिक शोषणाबद्दलची माहिती दिली.
−  गोखले यांची १८९९ मध्ये मुंबई प्रांताच्या कायदे मंडळावर तर १९०२ मध्ये व्हाईसरॉयच्या 'इंम्पिरिअल कौन्सिल' मध्ये नियुक्ती झाली.
−  या दोन्ही ठिकाणच्या गोखले यांच्या भाषणामुळे ब्रिटिश मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते.
−  गोखले हे इंग्लंडमध्ये भारताचे पहिले लोकप्रतिनिधी होते. गोखलेनी १८९५ मध्ये राष्ट्रीय सभेचे सचिव पद भूषविले.
−  १९०५ साली गोखलेंनी 'भारत सेवक समाजाची' स्थापना केली. साम्राज्याअंतर्गत स्वराज्य आणि देश बांधवांची उन्नती ही भारत सेवक समाजाची उद्दिष्टे होती.
−  १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्यात गोखले यांचा मोठा सहभाग होता.
−  नामदार गोखले यांनी ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशाप्रमाणे भारतालाही वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात यावे अशी मागणी १९०५ मध्ये केली.
−  म. गांधीजी गोपाळ कृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानत. त्यांनी आपल्या गुरूला ‘गंगेची' उपमा दिली.
−  गोखलेंच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजवणारा वक्ता माझ्या नाही असे लॉर्ड कर्झनने म्हटले.
−  “The Diamond of India and Jewel of Maharashtra' 37211 शब्दात टिळकांनी गोखलेंचा गौरव केला.

जहाल कालखंड/टिळक युग १९०५-१९२०


−  लोकमान्य टिळक, पंजाब केसरी लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल (लाल-बाल-पाल) व अरविंद घोष इ. नेत्यांचा जहाल कालखंडामध्ये समावेश होतो.
−  मवाळांच्या ब्रिटिशधार्जिण धोरणांचा भारतीय जनतेस फायदा झाला नाही. याची जाणीव जहाल विचारांच्या तरुणात होत होती.
−  १९०५ मध्ये जपान या छोट्याशा आशियाई राष्ट्राने रशिया या बड्य पाश्चात्य राष्ट्रांचा पराभव केला.ही घटना भारतीयांना प्रेरणादायी ठरली.
−  १६ ऑक्टोबर १९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची अन्यायी फाळणी केली. यातूनच जहाल- मवाळ यांच्यात मतभेद वाढत जाऊन १९०७ च्या सुरत अधिवेशनात जहालांनी मवाळांपासून फारकत घेतली.
−  १८९१ मध्ये 'अँबेसिनिया' या दक्षिण आफ्रिकेतील देशामध्ये झालेल्या क्रांतीनंतर ते इटलीच्या पारतंत्र्यातून मुक्त झाले.
−  इटलीमध्ये कॉरी बॉर्डी, काहू मॅझिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादाची निर्मिती झाली.
−  या सर्व आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम म्हणून भारतातील राष्ट्रीय चळवळ मवाळवाद्यांकडून जहालवाद्यांकडे विकसित होऊ लागली.
⋇  बंगालची फाळणी :१६ ऑक्टो १९५०
−  बंगालच्या फाळणीची मुळ कल्पना सर विल्यम वॉर्ड (१८९६) यांची होती.
−  बंगालच्या फाळणीस विरोध सर हेनरी कॉटन यांनी केला होता.
−  बंगालमधील गव्हर्नर सर अॅण्ड्यू फ्रेजर यांनी १९०३ मध्ये बंगालच्या फाळणीची योजना तयार केली.
−  फाळणी संदर्भात पहिल्यांदा अधिकृतपणे लंडन मधील ‘स्टैंडर्ड' या वर्तमानपत्रामध्ये छापण्यात आले.
−  ७ जुलै १९०५ रोजी सिमला येथून बंगालच्या फाळणीची योजना ब्रिटिश सरकारने घोषित केली.
−  १६ ऑक्टोबर १९०५ रोजी बंगालची फाळणी अंमलात आणली आणि वंगभंग आंदोलनास सुरूवात झाली.
−  १६ ऑक्टोबर १९०५ हा फाळणीचा दिवस बंगाली जनतेने दुखवटा दिन म्हणून पाळला.
−  फाळणीचा विरोध करण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टाऊन हॉल मध्ये विशाल सभेचे आयोजन करण्यात आले.
−  रविंद्रनाथ टागोर यांनी सुचवल्याप्रमाणे फाळणीच्या दिवशी एकमेकांना राख्या बांधून व गंगा स्नान करून फाळणीचा विरोध करण्यात आला.
−  आम्ही सर्व बंधुबंधू असून जगातील कोणतीही शक्ती आमचे ऐक्य दुभंगू शकणार नाही असा राखी बंधनाचा प्रतिकात्मक अर्थ लावण्यात आला.
−  स्वदेशीचा पुरस्कार करून परकीय मालावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झाली.
−  डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा औषधांचा स्वदेशी कारखाना काढला.
−  बंगालमधील लोकांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून फेडरेशन हॉलची पायाभरणी करण्यात आली.
−  ७० लाख रूपयांचा स्वराज्य फंड निर्माण करण्यात आला.
−  पूर्व बंगाल व आसाम हा नवा प्रांत निर्माण होऊन सर फुलर यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली. व नविन प्रांताची राजधानी ढाका ठेवण्यात आली.
−  भारतमंत्री मोर्ले यांनी बंगालची फाळणी रद्द होण्याची कोणीही आशा करु नये असे ब्रिटिश पार्लमेंट मध्ये जाहीर केले. त्याबद्दल टिळकांनी केसरी' वृत्तपत्रात 'भ्रमाचा भोपळा फुटला' असा लेख लिहिला.
−  लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळीसाठी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हा चतुःसुत्री कार्यक्रम भारतीयांना दिला.
−  स्वराज्याचे उद्दिष्ट साध्य करणे हा चतुःसुत्री कार्यक्रमाचा उद्देश होता.
−  नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी इंग्लडला जाऊन फाळणी रद्द व्हावी म्हणून प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले.
−  'तरूण पिढी आम्हास विचारू लागली आहे की, बंगालच्या फाळणीसारखे फळ आमच्या पदरात पडणार असेल तर सनदशीर राजकारणाचा आम्हास काय उपयोग' असे नामदार गोखलेंनी म्हटले.
−  वंगभंग विरोधी आंदोलन राष्ट्रव्यापी बनल्याने १२ डिसेंबर १९११ मध्ये लॉर्ड हार्डिंग ने भरविलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली आणि भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा हा पहिला मोठा विजय ठरला.

महत्वाची अधिवेशने


⋇  १९०५ चे बनारस अधिवेशन -
−  या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे होते.
−  या अधिवेशनामध्ये बंगालच्या फाळणीबद्दल ब्रिटिश शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला.
−  गोखले यांनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष स्थानावरून प्रथम ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे आमचे ध्येय राहील अशी घोषणा केली.
−  नामदार गोखलेंनी भारतमंत्री मोर्ले यांना वेल्सचा राजकुमार व राजकुमारी यांच्या भारतभेटीचे राष्ट्रीय सभा एकमताने स्वागत करेल असे आश्वासन दिले होते.
−  पण गोखलेंच्या या योजनेस जहालांनी विरोध केला.
−  जहालांनी या अधिवेशनात म्हणजेच १९०५ ला आपला नवा 'राष्ट्रीय पक्ष' (National Party) स्थापन केला.

टिप्पण्या