⋇ १९०६ चे कोलकत्ता अधिवेशन :
− या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते.
− दादाभाई नौरोजींनी अध्यक्षीय भाषणात चळवळ करा - 'चळवळ करा, अखंड चळवळ करा' असा संदेश देऊन स्वराज्य हे आमच्या राष्ट्रीय चळवळीचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे घोषित केले.
− या अधिवेशनात लोकमान्य टिळकांची स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुःसुत्रीस मान्यता देण्यात आली.
− याच अधिवेशनात बंगालची फाळणी रद्द करण्यासंबंधी ठराव ढाक्याच्या नवाब ख्याज्या अतिउल्ला यांच्याकडून मांडला.
− स्वराज्य या शब्दाचा 'संपूर्ण स्वातंत्र्य' असा अर्थ जहालांनी लावला. तर'वसाहतीचे स्वातंत्र्य' असा अर्थ मवाळांनी लावला.
⋇ १९०७ चे सुरत अधिवेशन :
− सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. रासबिहारी घोष होते.
− सुरतचे हे २३ वे ऐतिहासिक अधिवेशन काँग्रेसमध्ये जहाल - मवाळ फुट पाडण्यास कारणीभूत ठरले.
− सभेच्या कार्यक्रम पत्रिकेतून मवाळांनी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हे शब्द वगळल्याने जहाल नाराज झाले होते.
− १९०६ च्या कोलकत्ता अधिवेशनातच ठरले होते की, राष्ट्रीय सभेचे पुढचे अधिवेशन नागपूरला भरवावे पण नागपूरमध्ये जहालांचा प्रभाव मोठा असल्याने मवाळांनी नागपूर ऐवजी सुरतला अधिवेशन भरविले.
− जहालांना अध्यक्षपदी लाला लजपतराय हवे होते. परंतु मवाळांनी डॉ. रासबिहारी घोष यांची अध्यक्षपदी निवड केली आणि काँग्रेसमध्ये जहालमवाळ फुट पडली.
⋇ १९१६ चे लखनौ अधिवेशन :
− लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मजूमदार होते.
− १९१४ मध्ये लोकमान्य टिळक तुरूंगातून सुटले व १९१५ साली मवाळ नेते नामदार गोखले व फिरोजशहा मेहता यांचा मृत्यू झाला आणि राष्ट्रीय सभेवर टिळकांच्या पर्यायाने जहालांचा प्रभाव वाढला.
− लखनौ अधिवेशनात जहाल - मवाळ यांच्यात ऐक्य घडून आले. याला लखनौ करार/ ऐक्य करार/ हिंदू - मुस्लिम ऐक्य असेही म्हणतात.
− लखनौ अधिवेशनातच राष्ट्रीय सभा व मुस्लिम लिग यांचे ऐक्य घडून आले. यापूर्वी मुस्लिम लिग ही ब्रिटिश सरकारला पाठिंबा देत होती व राष्ट्रीय सभेने चालविलेल्या चळवळीस विरोध करत होती.
⋇ १९१७ चे कोलकत्ता अधिवेशन :
− या अधिवेशनाच्या अध्यक्षा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा डॉ. अॅनी बेझंट या होत्या.
− याच अधिवेशनात महर्षी वी.रा. शिंदे यांनी 'अस्पृश्यता विरोधी' ठराव मांडला.
⋇ १९२५ चे कानपूर अधिवेशन :
− या अधिवेशनाच्या अध्यक्षा पहिल्या भारतीय महिला सरोजनी नायडू होत्या.
− भारताचा अनभिषक्त राजा आणि ‘लोकमान्य' म्हणून ओळखले जाणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे एका ब्राम्हण कुटूंबात २३ जुलै १८५६ रोजी झाला.
− टिळक १८७२ ला १०वी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणांसाठी त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
− १८७६ ला गणित विषय घेवून बी.ए. उत्तीर्ण झाले आणि १८७९ मध्ये एल.एल.बी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
− २ जानेवारी १८८० रोजी पुण्यात निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांनी 'न्यू इंग्लीश स्कूल' स्थापना केली.
− टिळकांनी लोकशिक्षण व जनजागृती घडवून आणण्यासाठी जानेवारी १८८१ मध्ये मराठा (इंग्रजी) व केसरी (मराठी) ही वृत्तमानपत्रे सुरू केली.
− मराठाचे संपादकत्व लोकमान्य टिळकांनी तर केसरीचे संपादकत्व आगरकरांनी केले.
− २४ ऑक्टोबर १८८४ रोजी टिळकांनी 'डेक्कन एज्यूकेशन सोसायटीची' स्थापना केली.
− २ जानेवारी १८८५ रोजी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.
− १८९३ साली 'सार्वजनिक गणेशोत्सव' व १८९५ साली 'शिवजयंती' हे उत्सव सुरू करून या उत्सवाच्या माध्यमातून टिळकांनी लोकजागृती घडवून आणली
− १८९३ च्या गणेश उत्सवामुळेच 'तेल्या - तांबोळ्यांचे पुढारी' म्हणून लोकमान्य टिळकांची ओळख निर्माण झाली.
− १८९७ मध्ये प्लेग कमिशनर रॅडच्या हत्येचे समर्थन केल्याने टिळकांना दीड वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली.
− टिळकांनी आपल्या केसरी वर्तमानपत्रामध्ये ‘राज्य करणे म्हणजे सुड घेणे नव्हे' असा अग्रलेख लिहीला होता. व त्यामध्ये रॅडच्या हत्त्येबद्दल गणेशखिंडीचा गणपती पावला असे म्हटले होते.
− १९०८ साली पुन्हा टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली ६ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
− या शिक्षेसाठी टिळकांना मंडालेच्या तुरूंगात ठेवण्यात आले.याच टिळकांनी गीतारहस्य व वैदिक कॉनॉलॉजी' हे प्रसिध्द ग्रंथ लिहिले.
− या ग्रंथामुळे टिळकांची विद्वता व ज्ञानसाधना लोकांसमोर आली.
− लो. टिळकांनी सार्वजनिक सभेमार्फत ‘खंडबंदीची चळवळ' उभारून सभेचा प्राभाव वाढविला.
− 'गीतारहस्य' म्हणजे तत्वज्ञानावरील महान वैचारिक ग्रंथ होय. या ग्रंथाद्वारे त्यांनी जनतेला ‘फळाची आशा न धरता सतत कार्य करत राहण्याचा संदेश दिला.
− महात्मा गांधी १९१४ ला भारतात आल्यावर असे म्हटले की, 'टिळक हे मला महासागरासारखे वाटले, गोखले हे मात्र गंगेप्रमाणे भासले.'
− प्रत्यक्षात रेल्वेचा फायदा भारतीय उद्योगापेक्षा ब्रिटिश व्यापारालाच जास्त झाला. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी याचे वर्णन 'decorating another's wife' (दुसऱ्याच्या पत्नीला आभूषणे घालणे) असे केले.
− 'चळवळीचे चटके बसल्याशिवाय ब्रिटिशसत्ता वितळनार नाही' असे लोकमान्य टिळक म्हणत असत.
− १९१४ ला टिळकांची तुरूंगातून सुटका झाल्यावर त्यांनी डॉ. अॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीत स्वतःला समर्पित केले.
− टिळकांनी १९१५ ला भाषावार प्रांत रचनेची मागणी केली.

बाळ गंगाधर टिळक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा