⋇ होमरूल चळवळ (स्वशासन) :
− डॉ. अॅनी बेझंट यांनी १९१५ ला मद्रास प्रांतातील अड्यार येथे 'होमरूल लीग'ची स्थापना केली.
− १९१६ मध्ये डॉ. अॅनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी संयुक्तपणे होमरूल चळवळ सुरू केली.
− आयर्लंड मधील होमरूलच्या धरतीवर ही चळवळ आधारीत होती.
− भारतीय जनतेस राजकीय हक्क मिळाले पाहिजे व भारतातील प्रातिनिधीक संस्था अधिक व्यापक म्हणून त्यांच्या अधिकारात वाढ केली पाहिजे अशा होमरूल लीगच्या मागण्या होत्या.
− लोकमान्य टिळकांनी १९१६ मध्ये महाराष्ट्रातील पुण्यात होमरूल लीगची स्थापना केली व त्याच्या अध्यक्षपदी जोसेफ बॅबटीस यांची नियुक्ती केली.
− लाला लजपतराय यांना होमरूल लीगच्या प्रचारासाठी अमेरिकेला पाठविण्यात आले.
− होमरूल लीगचा ब्रिटिश सरकारने धसका घेवून टिळकांची दिल्ली व पंजाब येथे प्रवेश बंदी केली.
− होमरूल लीगच्या बेळगाव अधिवेशनात टिळकांनी, 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच.
− ' आम्ही ब्रिटिशांना स्वराज्याची भिक मागणार नाही. कारण तो आमचा हक्कच आहे असे टिळक म्हणत असे
⋇ ऑगस्ट घोषणा :२० ऑगस्ट १९१७
− २० ऑगस्ट १९१७ ला भारतमंत्री लॉर्ड माँटेग्यू यांनी केलेल्या या घोषणेनुसार भारताला क्रमाक्रमाने जबाबदार राज्यपध्दती दिली जाईल असे घोषित केले.
− मॉटेंग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा : १९१९ समंत करण्यात आला.
⋇ टिळकांची प्रतियोगी सहकारिता : १९१९
− सरकारला जर भारतीयांच्या मागण्या विषयी सहानुभूती असेल तर भारतीय जनता ही सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी १९१९ च्या कायद्यासंदर्भात म्हटले.
− १९१९ च्या अमृतसर अधिवेशनात मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सभेने या धोरणास मान्यता दिली.
− १९२० च्या निवडणूका लढविण्यासाठी टिळकांनी काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस डेमोक्रटिक पार्टी' (Congress Democratic Party) हा पक्ष स्थापन केला.
− ब्रिटिश पत्रकार सर व्हलनटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हटले आहे.
− १ ऑगस्ट १९२० च्या पहाटेस लोकमान्य टिळकांचे मुंबई येथे देहवसान झाले.
− जागतिक शांततेचे महान दूत म्हणून ओळखले जाणारे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरात मधील काठेवाड जिल्ह्यातील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला.
− महात्मा गांधीजी यांचे वडील पोरबंदरचे दिवाण होते.
− गांधीजींनी मुंबईत उच्च शिक्षण घेतल्यानंतर इंग्लंडमध्ये बार - अॅट - लॉ (L.L.B) ही पदवी. घेऊन गांधीजी १८९१ मध्ये भारतात परतले.
− गांधीजीनी भारतात प्रथम राजकोट व नंतर मुंबई येथे वकीली केली.
− गांधीजी आफ्रिकेत असतांना जॉन रस्कीन यांच्या 'अन् टू धीस लास्ट' या पुस्तकाचा गांधीजीवर प्रभाव पडला.
− गांधीजींनी १९१४ मध्ये मतदानाचा हक्क हिरावून घेणारा कायदा व त्यांच्यावरील जिझियासारखे कायदे रद्द करून नाताळ येथे सत्याग्रहाचा पहिला प्रयोग यशस्वी करून ब्रिटिशांनी हिंदी लोकांवर लादलेले निबंध दूर केले.
− गांधीजींनी नाताळ येथे लोकांना संघटित करून 'नाताळ इंडियन काँग्रेस' ही संघटना स्थापन केली व 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र सुरू केले.
− २५ मे १९१५ रोजी गांधीजींनी साबरमती नदीच्या किनारी सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली.
− गांधीजींनी रचनात्मक कार्यक्रम राबवितांना ग्रामोद्योग संघ, बुनियादी संस्था, गोरक्षण संस्था यासारख्या शिक्षण संस्था स्थापन केल्या.
− म. गांधींनी झूलू युद्धाच्या वेळी रेडक्रॉसमध्ये केलेल्या सेवेबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कैसर - ए - हिंद' पदवी बहाल केली.
− गांधीजींनी यंग इंडिया व हरिजन ही वृत्तपत्र सुरू केली.
⋇ चंपारण्य सत्याग्रह : १९१७
− १९१६ च्या लखनऊ अधिवेशनात बिहार येथे राजकुमार शुक्ल या निळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांने गांधीजींना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत सांगितले.
− १९१७ साली राजेंद्रप्रसाद, मजरूल हक, जे.बी. कृपलानी, महादेवभाई देसाई यांच्यासहीत गांधीजींनी बिहारमधील चंपारण्यजवळील मोतीहरी येथे सत्याग्रह करून तो यशस्वी केला. व ब्रिटिश मळेवाल्यांच्या जाच्यातून निळ पिकवणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांची सुटका केली.
− महात्मा गांधीजींचा हा भारतातील पहिला सत्याग्रह होय.
⋇ अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा : १९१८
− १९१८ मध्ये महात्मा गांधीजींनी गिरणी कामगारांसाठी गिरणी मालकाविरूध्द आमरण उपोषण केले.
− गिरणी मालक उपोषणाच्या चौथ्याच दिवशी नमले व गिरणी मालकानी कामगारांच्या पगारात ३५% वाढ केली.
⋇ खेडा सत्याग्रह : १९१८
− १९१८ साली गुजरात मधील खेडा जिल्ह्यात मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकऱ्याच्या पुढाऱ्याने गांधीजींनी साराबंदीची चळवळ सुरू करून ब्रिटिश सरकारकडून शेतसारा माफ करून घेतला.
⋇ रौलट कायदा (काळा कायदा) : १९१९
− भारतातील दहशतवादी क्रांतिकार्याला आळा घालण्यासाठी उपाययोजनांची तरतूद असलेले हे विधेयक होते त्यासाठी नियुक्त झालेल्या समितीचे अध्यक्ष रौलट नावाचे न्यायाधीश होते.
− सिडने रौलट समितीच्या शिफारशीनुसार ब्रिटिश सरकारने रौलट कायदा पास केला.
− रौलट कायद्यानुसार कोणत्याही भारतीय व्यक्तीस विनाचौकशी तुरूंगात डांबने, सरकारविरोधी विचारांचे साहित्य छापणे, जवळ ठेवणे हा राजद्रोह ठरविण्यात आला.
− 'ब्लॅक बिल' म्हणून रौलट कायद्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला.
− गांधीजींनी ६ एप्रिल १९१९ मध्ये रौलट कायद्याविरूध्द देशभर हरताळ पाळण्याचे आव्हान केले.

गांधी युग / पर्व : १९२० - १९४७

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा