⋇  जालियनवाला बाग हत्याकांड : १३ एप्रिल १९१९
−  रौलेट कायद्याविरूद्ध पंजाबमध्ये जनमत आक्रोश बनल्याने १० एप्रिल १९१९ रोजी ब्रिटिश सरकारने डॉ. सैफुद्दीन किचलू व डॉ. सत्यपाल या प्रमुख नेत्यांना अटक केली.
−  एडवर्ड हॅरी डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने अमृतसरमध्ये सभा बंदीचा आदेश जारी केला.
−  १३ एप्रिल १९१९ रोजी वैशाखी (बैसाखी) सणाच्या दिवशी अमृतसर मधील जालियनवाला बागेत २०,००० लोकांची निषेध सभा भरली होती.
−  या सभेवर जनरल डायरने दारूगोळा संपेपर्यंत गोळीबार केला.
−  जनरल डायरने झाडलेल्या सुमारे १६०० फेऱ्यामध्ये ४०० लोक मृत्यूमुखी पडले तर २००० हून अधिक जखमी झाले.
−  जालियनवाला हत्याकांडाच्या निषेधार्थ रविंद्रनाथ टागोर यांनी 'सर' या पदवीचा त्याग केला.
−  पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायर याने गोळीबाराचा आदेश दिला होता.
−  १५ एप्रिल १९१३ रोजी मायकल ओडवायर संपूर्ण पंजाबमध्ये लष्करी कायदा लागू केला
−  १९४० साली सरदार उधमसिंगने इंग्लडमध्ये मायकल ओडवायरचा खून करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला.
⋇  . W.W. Hunter Commission :
−  जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी ब्रिटिश सरकारने १९१९ मध्ये 'हंटर कमिशन' नेमले.
−  २८ मे १९२० रोजी हंटर कमिशनने आपला अहवाल सादर केला.
−  हंटर कमिशनने जनरल डायरवर कोणतीही कार्यवाही केली नाही. हंटर कमिशनचा अहवाल रंगसफेदी करणारा होता.
⋇  खिलाफत चळवळ :१९१९
−  तुर्कस्तानचा खलिफा हा जगभरातील मुस्लिमांचा प्रमुख मानला जात होता.
−  पहिल्या महायुद्धाचा शेवट कसाही झाला तरी खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन ब्रिटिशांनी भारतीय मुस्लीमांना दिले.या आश्वासनावर विसंबून भारतीय मुसलमाना महायुद्धकाळात मदत केली.
−  परंत युद्धोतर शांतता परिषदेच्या वेळी ब्रिटिश पंतप्रधान ‘लाईड जॉर्ज' यांनी अश्वासनाचा भंग केला. युद्ध समाप्तीनंतर इंग्रज व फ्रेंच यांनी तुर्कस्तानच्या साम्राज्याचे तुकडे केले.
−  तुर्कस्तानच्या खलिफाला पाठींबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली.
−  मौलाना महम्मद अली व शौकत अली हे बंधू खिलाफत चळवळीचे प्रमुख नेते होते.
−  दिल्ली येथे नोव्हेंबर १९१९ मध्ये भरलेल्या खिलाफत परिषदेचे महात्मा गांधी अध्यक्ष होते.
−  हिंदू - मुस्लिम ऐक्य घडवून ब्रिटिशांविरूध्द ताकद वाढविण्यासाठी गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला.
−  तुर्कस्तानात मुस्तफा केमालपाशा सत्तेवर आला व त्याने तुर्कस्तानचे आधुनिकीकरण केले. १९२४ मध्ये त्याने खलिफाचे पद नष्ट केले त्यामुळे खिलाफत चळवळ आपोआप लोप पावली.

असहकार चळवळ १९२०


−  १ ऑगस्ट १९२० च्या पहाटे लोकमान्य कालवश झाले. त्यांच्या मृत्यूचा दुःखवटा व असहकाराच्या देशव्यापी आंदोलनाची सुरूवात एकाच दिवशी झाल्याने भारतभर जनतेने हरताल पाळून मिरवणूका काढल्या.
−  सप्टेंबर १९२० च्या कोलकत्ता अधिवेशनात लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली असहकार चळवळीचा आराखडा मांडून तो मंजूर केला.
−  डिसेंबर १९२० च्या नागपूर अधिवेशनात चक्रवर्ती विजय राघवाचारी यांच्या अध्यक्षतेखाली असहकार चळवळीच्या ठरावास मान्यता देण्यात आली.
−  या अधिवेशनात काँग्रेसच्या ध्येय धोरणात बदल करणारी घटनादुरूस्ती संमत करण्यात आली.
−  त्यानुसार स्वराज्य प्राप्ती हे काँग्रेसचे ध्येय असेल आणि त्याची प्राप्ती सनदशीर व शांततामय मार्गाने करावी व सामुदायिक चळवळीचाही अवलंब करावा.
−  १५ सदस्यांची काँग्रेस वर्कंग कमिटी स्थापन करण्यात आली व या कमिटीने काँग्रेसचे नेतृत्व करावे असे ठरविण्यात आले.
−  भाषिक आधारावर काँग्रेस समित्या व विभागवार समित्या स्थापन करण्यात आल्या.
−  १९२० च्या नागपूर अधिवेशनात म. गांधीजींनी अशी घोषणा केली की, असहकार चळवळ पुर्णत्वाने अंमलात आणल्यास स्वराज्य एका वर्षात मिळवता येईल.
−  राष्ट्रीय सभेच्या इतिहासात नागपूर अधिवेशन अत्यंत महत्वाचे आणि क्रांतिकारी ठरले.
−  महात्मा गांधीजींच्या देशनेतेपदावर नागपूरलाच एक प्रकोर शिक्कामार्फत झाले. असहकार चळवळीत शाळा, महाविद्यालये, विधीमंडळ, न्यायालय, परदेशी माल यावर बहिष्कार टाकून स्वदेशी चा पुरस्कार करण्यात आला.
−  स्वदेशीचा पुरस्कार म्हणून आचार्य नरेंद्र देव, सी.आर. दास, लाला लजपतराय, झाकीर हुसेन, सुभाषचंद्र बोस इत्यादींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या.
−  त्यामध्ये काशी विद्यापीठ, बिहार विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ इत्यादी संस्थांचा समावेश होता.
−  सी.आर. दास, मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर एम.आर. जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, सी. राजगोपालाचारी अशा नामवंत वकीलांनी आपल्या वकीली व्यवसायाचा त्याग केला.
−  महात्मा गांधीजींनी 'कैसर - ए - हिंद' या पदवीचा तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'आय सी एस' या पदाचा त्याग केला.
−  १७ नोव्हेंबर १९२१ रोजी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत भेटीचे संप व निदर्शने करून स्वागत करण्यात आले.
−  स्वराज्य व स्वदेशी यांचे प्रतिक असलेला चरखा घराघरात पोहचविण्यात आला.
−  १९२१ या एकाच वर्षात भारतात ३९६ संप झाले. टिळक स्वराज्य फंडासाठी लोकांनी १ कोटीहून अधिक रक्कम टिळकांच्या स्मरणार्थ जमा केली.

टिप्पण्या