⋇ स्वामी दयानंद सरस्वती
− स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म २० सप्टेंबर १८२४ रोजी गुजरातमधील मोरवी संस्थानातील ‘टंकारा' येथे झाला.
− त्यांचे मुळ नाव ‘मुळशंकर करसनदास तिवारी' होते.
− स्वामी दयानंदानी १८४५ मध्ये म्हणजेच वयाच्या २१ व्या वर्षी गृहत्याग करून संन्यास स्विकारला व देशभर भटकंती सुरू केली.
− १८६०-६३ मथुरेतील अंध संत स्वामी विरजनंद यांचे शिष्यत्व पत्करून तीन वर्षे हिंदू धर्माचा अभ्यास केला.
− स्वामी दयानंदानी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास साधणाऱ्या 'सत्यार्थप्रकाश' या ग्रंथांची १८७४ मध्ये रचना केली.
− वैदिक धर्माचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आणि प्राचीन वैदिक धर्म, संस्कृती व तत्त्वज्ञान यांच्या प्रचारासाठी स्वामी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे ‘आर्य समाजा'ची स्थापना केली.
− १८७७ मध्ये लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली.
− आर्य समाजाने महाराष्ट्रात मुंबई, सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये चालवली.
− केशवचंद्र सेन यांच्या सूचनेवरून स्वामी दयानंदानी हिंदी भाषेतून धर्म प्रसारास सुरुवात केले.
− स्वामी दयानंदांनी 'ऋग्वेद' व 'यजुर्वेद' वेदांचे हिंदीत भाषांतर केले.
⋇ आर्य समाजाचे तत्त्वज्ञान :
− स्वामी दयानंदानी पंजाबमध्ये आपल्या धर्मबांधवाना 'वेदाकडे परत चला' असा संदेश दिला.
− परमेश्वर हा सचिदानंद स्वरूप असून तो अनंत निराकार सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान व दयाळू आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालनकर्ता आहे.
− ईश्वर एकच असून तो निर्गुण व निराकार आहे. चातुर्वर्ण्य हे जन्मसिध्द नसून गुणकर्मावर अवलंबून असावे.
− प्रेम, न्याय व वैयक्तिक सद्गुण यांवर आधारित वर्तणूक ठेवणे हे कर्तव्य आहे.
− भगिनी निवेदिता यांनी 'लढाऊ हिंदू धर्म' अशा शब्दात आर्य समाजाची प्रशंसा केली.
− लाला हंसराज, पं. गुरूदत्त, लाला लजपतराय, स्वामी श्रध्दानंद हे आर्य समाजाचे कार्यकर्ते होते.
− आर्य समाजाचे कार्यकर्ते लाला हंसराज यांनी लाहोर येथे ‘दयानंद अँग्लोवैदिक कॉलेज' स्थापन केले.
− परधर्मात गेलेल्या हिंदूना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची ‘धर्मशुध्दीची क्रांतिकारी चळवळ' आर्य समाजाने राबविली.
− ३० ऑक्टोबर १८८३ रोजी स्वामी दयानंद सरस्वतींचा मृत्यू झाला.
⋇ थिऑसॉफिकल सोसायटी :
− थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना अमेरिकेतील 'न्यूयार्क' शहरात १८७५ मध्ये कर्नल हेन्री स्टील अलकॉट (अमेरिका ) व मॅडम रशिया यांनी केली
correction − प्राचीन भारतीय संस्कृतीची जोपासना करणे व भारतीयांना त्याचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली.
− मद्रास प्रांतातील ‘अड्यार' येथे १८८२ साली थिऑसॉफिकल सोसायटीचे केंद्र स्थापन करण्यात आले.
− अॅनी बेझंट १८९३ मध्ये भारतात येऊन 'भारत भूमी हीच माझी खरी भूमी आहे' असे म्हणून थिऑसॉफिकल सोसायटीच्या तत्त्वज्ञानाद्वारे भारताच्या राजकीय व धार्मिक उद्धारासाठी स्वतःला समर्पित कले
⋇ मुस्लिम समाजातील सुधारणा:
− मुस्लिम सुधारणा चळवळीची सुरूवात बंगालमध्ये नवाब अब्दुल लतिफ यांनी केली.
− नवाब अब्दूल लतिफ यांनी विज्ञान व शिक्षण यांच्या प्रसारासाठी बंगालमध्ये मोहोमेडन लिटररी सोसायटी ही संस्था स्थापन केली.
− सर सय्यद अहमद यांचे प्रारंभीचे विचार वेगळेच होते. “हिंदू व मुसलमान म्हणजे सुंदर अशा भारत वधुचे दोन डाळे" आहेत.
− हिंदू व मुसलमान एक हृदय' एक आत्मा व्हावेत असे मत व्यक्त केले
− मुस्लिम समाजातील तरूणांना पाश्चात्य शिक्षणांचा लाभ मिळावा म्हणून सर सय्यद अहमद खान यांनी १८७५ मध्ये ‘मोहोमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज' स्थापन केले. याचेच पुढे 'अलीगड विश्व विद्यापीठात रूपांतर झाले.
− संपूर्ण देशाचे प्रतिनिधीत्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्याचा मान सेवानिवृत्त ब्रिटिश अधिकारी सर अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांना मिळतो.
− अॅलन ह्यूम यांना या कामासाठी सर विल्यम वेडरबर्न, सर हेन्री कॉटन व व्हाईसराय लॉर्ड डफरीन यांचे सहकार्य लाभले.
− काँग्रेस स्थापनेसाठी कारणीभूत ठरलेल्या अॅलन हाम यांनी राष्ट्रीय सभा ही मुळात भारतीय लोकातील असंतोष स्फोटक स्वरूपात व्यक्त न होता, सुरक्षित मार्गाने व्यक्त व्हावा या दृष्टीने राष्ट्रीय सभेने 'सुरक्षा कवच' म्हणून काम करावे असा उद्देश व्यक्त केला. (sefty value)
− राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे नियोजित होते. परंतु पुण्यात कॉलराची साथ पसरल्याने २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात हे पहिले अधिवेशन संपन्न झाले.
− पहिल्या अधिवेशनाला देशभरातून ७२ प्रतिनिधी उपस्थित होते.
− या प्रतिनिधी मध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वांच्छा, न्या. तेलंग, न्या. रानडे, डॉ. भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, रंगय्या नायडू, जी. सुब्रम्हण्यम्, वीर राघवाचार्य, आनंदा चारलू, लाला मूरलीधर इ. समावेश होता.
− या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष सर व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. ते पहिले ख्रिश्चन अध्यक्ष ठरले.
− या पहिल्या अधिवेशनात एकूण ९ ठराव पास झाले.
१) भारत मंत्र्यांचे इंडिया कौन्सिल बरखास्त करावे
२) भारताच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती नेमावी.
३) केंद्रिय व प्रांतिक कायदेमंडळात भारतीयांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी द्यावेत.
4) भारतात लष्करावर जो खर्च केला जातो त्यात इंग्लंडचाही वाटा असावा.
५) आय.सी.एस. परीक्षेची वयोमर्यादा वाढवून ती परीक्षा भारतात घेतली जावी
६) भारतीय मालाला संरक्षण मिळेल असे धारेण ब्रिटिशांनी अवलंबावे.
७) मिठावरील कर रद्द करावा.
८) भारतीयांना राज्यकारभारात घेतले जावे.
९) शेतकऱ्यांवरील कराचा बोजा हलका करावा.
− १८८९ मध्ये राष्ट्रीय सभेची एक शाखा लंडन येथे सुरू करण्यात आली होती. − १८८६ च्या दुसऱ्या 'कोलकाता' अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते व ते पहिले फारशी अध्यक्ष ठरले.
− १८८७ च्या तिसऱ्या 'चेन्नई’ अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते.
− १८८८ च्या चौथ्या ‘अलाहाबाद' अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज युल होते व ते पहिले विदेशी अध्यक्ष ठरले.

भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना : २८ डिसेंबर १८८५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा