राणीचा जाहिरनामा


−  १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद दरबारात लॉर्ड कॅनिंग याने राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित केला. त्यानुसार भारतातील कंपनीची राजवट बरखास्त करून भारतातील कारभार राणीच्या वतीने पहिला जाईल म्हणजेच भारतावर सर्वार्थाने इंग्लडची मालकी राहील असे घोषित केले.
⋇ जाहीरनाम्यातील तरतूदी: −  या जाहीरनाम्यानुसार गव्हर्नर जनरल हा राणीचा व्हाईसरॉय (प्रतिनिधी) म्हणून भारतावर राज्य करणार.
−  त्यानुसार 'लॉर्ड कॅनिंग ' हा भारताचा पहिला व्हॉइस रॉय बनला तर 'लॉर्ड स्टॅनले' हा पहिला भारतमंत्री बनला.
−  कंपनी काळातील संचालक मंडळ म्हणजेच 'बोर्ड ऑफ कंट्रोल' आणि 'बोर्ड ऑफ डायरेक्टर्स' ही मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी 'भारतमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ' यांची निर्मिती करण्यात आली.
−  भारतमंत्र्यांच्या मदतीसाठी १५ सदस्यांचे ‘इंडियन कौन्सिल' देण्यात आले. (पार्लमेंटचे ८ सदस्य + ७ कंपनी संचालक).
−  केंद्रस्थानी व्हाईसरॉय असला तरी प्रांताच्या प्रमुखपदी असलेल्यास गव्हर्नर' हे पदनाम कायम ठेवण्यात आले.
−  भारतीय संस्थानांच्या अंतर्गत राज्यकारभारात ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही.
−  भारतातील कोणतेही संस्थान यापुढे खालसा केले जाणार नाही व दत्तक वारसा मंजूर करण्यात येईल.
−  संस्थानांच्या विलीनीकरणाचा त्याग केला गेला आणि संस्थानिकांना स्वातंत्र्याची हमी देण्यात आली.
−  भारतीयांना राज्यकारभारात जास्तीत जास्त सहभागी करून घेण्याची संधी देण्यात आली.
−  वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून भारतीयांत भेदभाव न करता शासकीय नोकऱ्या देतांना ‘गुणवत्ता' हाच निकष पाहिला जाईल.
−  भारतीयांच्या सामाजिक व आर्थिक चालीरितीमध्ये कुठलाही हस्तक्षेप केला जाणार नाही.
−  कंपनी सरकारने भारतीय संस्थानिकांशी केलेले सर्व तह, करार पाळण्यात येईल. कायदे निर्मिती आणि त्यांच्या अंमलबजावणीत जनतेच्या भावनांचा विचार करण्यात येईल.

सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी


⋇ राजा राममोहन रॉय (१७७२ - १८३३)
−  आधुनिक भारताचा जनक, मानवतावादी समाजसुधारक, विधवा विवाहाचा पुरस्कता, १९ व्या शतकातील सुधारणा चळवळीचे जनक आणि प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून प्रसिध्द असलेले राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी बंगालमधील 'हुगळी’ जिल्ह्यातील ‘राधानगर' येथे एका संपन्न ब्राम्हण कुटूंबात झाला.
−  रॉय यांचे पंजोबा कृष्णचंद्र बॅनर्जी हे बंगालच्या नवाबाच्या सेनेत होते व त्यांना रॉय' ह्या उपाधिने सन्मानित करण्यात आले होते.
−  तेंव्हापासून त्यांच्या कुटूंबाने 'बॅनर्जी' या परंपरागत आडनावाऐवजी सन्मानित करण्यात आलेले 'रॉय' हे पदनाम वापरण्यास सुरूवात केली.
−  राजा राममोहन रॉय यांच्या वडिलांचे नाव 'रामकांतो रॉय' व आईचे नाव 'माता तैरिणी' देवी होते.
−  रॉय यांचे पर्शियन, अरबी, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, ग्रीक, लॅटिन, हिब्रु इत्यादी भाषेवर प्रभूत्व होते.
−  रॉय यांनी खाजगीरित्या मौलवीकडून ‘पार्शियन व अरेबिक' भाषेचे ज्ञान घेतले. त्यानंतर ते पार्शियन व अरेबिक भाषांचे सुयोग्य ज्ञान देणाऱ्या पाटणा येथील केंद्रावर गेले.
−  बनारस येथे राहून त्यांनी संस्कृत वाङ्मय कायदा व तत्त्वज्ञान आणि वेद व उपनिषदे यांचा अभ्यास केला.
−  राजा राममोहन रॉय यांनी वडिलांशी झालेल्या मतभेदावरून घर सोडले व तिबेट येथे जाऊन बौध्द धर्माचा अभ्यास केला.
−  १८०५ मध्ये राजा राममोहन रॉय हे ईस्ट इंडिया कंपनीत महसूल अधिकारी, जॉन दिग्बी यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले व पुढे दिवाण म्हणून त्यांना बढती मिळाली.
−  १८०९ मध्ये रॉय यांनी ‘एकेश्वरवाद्यांची देणगी' (The Gift of Monotheists) या नावाचे पार्शियन भाषेतील पुस्तक लिहीले.
−  राजा राममोहन रॉय यांनी १८१५ मध्ये कोलकाता येथे 'आत्मीय सभेची' स्थापना केली. आत्मीय सभा म्हणजे 'मित्रांचा समाज' होय.
−  आत्मीय सभेकडून ‘वंगाल गॅझेट' (Vangal Gazette) हे साप्ताहिक प्रकाशित होत होते.
−  १८१७ मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने कोलकाता येथे पहिले ‘पब्लिक स्कूल' सुरू केले.
−  १८१७ मध्येच कोलकाता येथे डेव्हिड हेअर यांच्या मदतीने 'हिंदू कॉलेजची' स्थापना केली.
−  रॉय यांनी १८२० मध्ये ‘द प्रिसप्टस ऑफ जिझस', 'द गाईड टू पीस अँड हॅपीनेस' हे ग्रंथ प्रकाशित केले.
−  'अँग्लो हिंदू स्कूल' या नावाची शाळा रॉय यांनी १८२२ मध्ये सुरू केली आणि या शाळेद्वारे त्यांनी इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिले.
−  १८२२ ब्रिटिश इंडिया युनिटेरीयन असोसिएशनची' स्थापना.
−  १८२२ मध्ये 'मिरात-उल-अखबार' हे पार्शियन भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले.
−  १८२३ साली दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींनी स्वातंत्र्यासाठी आपल्या मायदेशांविरुद्ध बंड पुकारले, त्यावेळी रॉय यांनी कोलकात्यात आनंदोत्सव साजरा केला.
−  राजा राममोहन रॉय यांनी १८२१ मध्ये 'संवाद कौमुदी' हे बंगाली भाषेतील पाक्षिक सुरू केले.
−  हिंदू एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी कोलकाता येथे 'वेदांत कॉलेज’ ची १८२५ मध्ये स्थापना केली.
−  राजा राममोहन रॉय यांनी २० ऑगस्ट १८२८ रोजी कोलकाता येथे 'ब्राम्हो समाज'ची स्थापना केली.
−  ब्राम्हो समाजाचा अर्थ, “एका खऱ्या ब्रम्हाची म्हणजे देवाची आराधना करणाऱ्याचा समाज होय'.
−  'एकेश्वरवाद व मूर्ती पूजा निषिध्द' ही ब्राम्हो समाजाची प्रमुख तत्त्वे होती.
−  'ब्रम्हॉनिकल मॅगेझिन' या मासिकातून ब्राम्होसमाजाच्या तत्त्वाचा प्रसार होत होता.
−  अगोदरचा दिवस हा 'भाद्रोत्सव' या नावाने तर नंतरचा दिवस ‘माघोत्सव'असे ब्राम्हो समाजाचे दोन महत्वाचे सण होते.
−  ब्राम्हो समाज ही बंगालमध्ये सुरू झालेली पहिली सामाजिक, धार्मिक चळवळ होती.
−  राजा राममोहन रॉय यांनी १८२९ चा सती प्रतिबंधक कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या सहकार्याने समंत केला.
−  मोघल सम्राट दुसरा अकबरशहा या बादशहाचे पेन्शन पुन्हा सुरू व्हावे म्हणून रॉय यांनी लंडनमध्ये प्रयत्न केले.
−  दुसऱ्या अकबरशहानेच राजा राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली.
−  रॉय यांनी 'वज्रसूची' या संस्कृत ग्रंथाचे भाषांतर केले.
−  'हिंदू संस्कृतीचा आत्मा' जागृत करण्याचे कार्य ब्राम्हो समाजाने केले,
−  'First Voice of Freedom', (स्वातंत्र्याची पहिली हाक) अशा शब्दात डॉ. शिषिर कुमार मिश्रा यांनी ब्राम्हो समाजाच्या कार्याचे कौतुक केले.
−  २७ सप्टेंबर १८३३ रोजी इंग्लड मधील ‘ब्रिस्ट्रॉल' येथे राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले.
−  राजा राममोहन रॉय यांच्या निधनानंतर १८४४ मध्ये महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राम्हो समाजाचे नेतृत्व केले.
−  देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांच्यात वाद झाल्यानंतर १८६६ मध्ये केशवचंद्र सेन यांनी 'भारतीय ब्राम्हो समाजा'ची स्थापना केली.
−  याच दरम्यान देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली मुळचा ब्राम्हो समाज हा 'आदी ब्राम्हो समाज' या नावाने ओळखला जाऊ लागला.
−  भारतीय ब्राम्हो समाजातून केशवचंद्र सेन यांचे सहकारीबाहेर पडून त्यांनी 'साधारण ब्राम्हो समाजा'ची स्थापना केली.

टिप्पण्या