दक्षिण भारतातील उठाव :


−  १८५७ च्या उठावापासून दक्षिण भारत बऱ्यापैकी वंचित राहिला. नागपूर येथे उठाववाल्यांचा उठावाचा प्रयत्न फसला. कारण नागपूरची राणी बाकाबाई ही ब्रिटिशांची एकनिष्ठ राहिली. त्यामुळे उठाव दक्षिणेकडे पसरू शकले नाही.
−  कोल्हापूर येथे ३१ जूलै १८५७ रोजी तेथील २१ व्या व २८ व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. १५ डिसेंबर १८५७ रोजी कोल्हापूरच्या महाराजांचा धाकटा भाऊ चिमाभाऊसाहेब याने शहरातच उठावाचा झेंडा उभारला.
−  खान्देशच्या भिल्लांनी उत्तरेकडील उठावांच्या घटनांपासून स्फुर्ती घेऊन सातपूडा भागात उठाव केला. खान्देशात भागोजी नाईक व काजीसिंह (कर्जासिंह) यांच्या नेतृत्वाखाली पंधराशेच्यावर भिल्लांनी उठाव केला व या उठावात ‘यावल' व 'नगर' मधील भिल्लही सामील झाले होते.
−  मध्यप्रदेशातील सागर प्रदेशात बाणापूर येथील राजांनी व रामगढच्या राणीने केलेला उठावाचा प्रयत्न सर ह्यू रोजने मोडून काढला.
−  सातपूडा भागात शंकरशहाच्या नेतृत्वाखाली उठावाचा प्रयत्न झाला.
−  रोहिलखंडात मौलवी अहमदुल्ला याने लोकांना उठावाची प्रेरणा दिली.

१८५७ च्या उठावाची अपयशाची कारणे:


−  ३१ मे १८५७ या नियोजित तारखेपुर्वीस उठावास सुरूवात झाली व उठावाचा प्रसार भारतभर झाला नाही.
−  १0 मे १८५७ रोजी सशस्त्र क्रांतीस मिरत छावणीतील हिंदी शिपायांनी सुरूवात केली.त्यामुळे क्रांतीच्या नेत्यामध्ये आणि क्रांतिकारकामध्ये एकच गोधळ उडाला. भारतीय नेत्यांना या गोंधळातून सावरता आले नाही.
−  निश्चित केलेल्या तारखेला संपूर्ण भारतात एकाचवेळी हे स्वातंत्र्ययुध्द झाले असते तर भारतात एकही इंग्रज जिवंत राहू शकला नसता.
−  १८५७ च्या उठावात संस्थानिकांनी इंग्रजांना मदत केली. त्यामध्ये काश्मिरचा डोंगरा-राजा-गुलाबासिंग, ग्वाल्हेरचा राजा जयाजीराव शिंदे, जिंद पतियाळा-नाभा व जयपूरचे शासक, हैद्राबादच्या निजामाचा दिवाणसालारजंग यांचा समावेश होता.
−  सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य राजेरजवाडे उठावापासून दूर राहिले. उठावा दरम्यान भारतीय क्रांतिकारकामधील ‘एकसुत्रतेचा व एककेंद्री' नेतृत्वाचा अभाव होता.
−  उठाववाल्यांना उठावात सर्वसामान्य नेता मिळू शकला नाही. उठावातील भारतीय नेते लष्करी डावपेचात कमी पडले.
−  केवळ उत्तर भारतातच उठावाचे लोण पसरले. दक्षिण भारत उठावाच्या प्रभावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला.
−  दक्षिण भारतात कोल्हापूर, सातारा, विजापूर, बेळगाव, नाशिक, पेठ, सुरगणा, औरंगाबाद, धारवाड, खानदेश, अहमदनगर, नरगुंद, जमखिंडी, मिरज, तासगाव, मुधोळ, जत व सोलापूर येथे १८५७ च्या क्रांतिची ठिणगी होती. परंतु उठाव फारसे तीव्र स्वरूपाचे नव्हते.
−  ब्रिटिशांना आंतरराष्ट्रीय परीस्थिती अनुकुल होती. रशिया सोबत चालू असलेल्या 'क्रिमियन युध्दात' ब्रिटिशांना विजय मिळाला होता व युध्दातील सैन्य भारतात आणले हाते.
−  इंग्रजाकडील एककेंद्री नेतृत्व आधुनिक शस्त्रे, कुशल सैन्य, दळणवळणाचा ताबा या सर्व बाबींमुळे ब्रिटिशांना उठाव मोडून काढणे शक्य झाले.

स्वातंत्र्य युध्द मानणारे विचारवंत -


⋇ स्वा. सावरकर :-
−  १८५७ चे 'स्वातंत्र्यसमर' या प्रसिध्द ग्रंथात १८५७ च्या क्रांतिची प्रधान कारणे असलेली दिव्य तत्त्वे म्हणजे 'स्वधर्म' व 'स्वराज्य' ही होत.
−  भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी केलेला योजनाबध्द संघर्ष.
−  १८५७ चा उठाव म्हणजे पहिले क्रांतियुध्द होय.
⋇ अशोक मेहता:
−  'The Great Rebellion' या पुस्तकात अशोक मेहता यांनी १८५७ चे बंड हे शिपायांच्या बंडाहून मोठे होते. अनेक ऱ्हासास जाणाऱ्या शक्तींना वाट मोकळी करून देणाऱ्या सामाजिक ज्वालामुखीचा तो स्फोट होता.
⋇  संतोष कुमार:
−  १८५७ चा उठाव म्हणजे केवळ शिपायांचे बंड नव्हते. तर तो प्रजेचा उठाव होता.
−  हिंदू आणि मुस्लिम यांनी घडवून आणलेली ती एक क्रांती होती.
⋇ कर्नल मालसन:- (लष्करी मोहिमेत भाग घेणारा)
− 'The Indian Mutiny of 1857' या १८७८-८० मध्ये प्रसिध्द झालेल्या आपल्या ग्रंथात असे म्हटले की, त्यावेळच्या परिस्थितीने मला हे दाखवून दिले की, भारतीय समाजात ब्रिटिशाबद्दलची दुष्ट व द्वेषजनक भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती. पण ही भावना वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती.
⋇ डॉ. सुरेंद्रनाथ सेन:
−  धर्मयुध्द म्हणून सुरू झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्ययुध्दाचे व. धारण केले.
⋇ पंडित जवाहरलाल नेहरू:
−  १८५७ चा उठाव हे राष्ट्रीय आंदोलन होते.
−  फ्रान्समध्ये १८५७ चा उठावाचे 'Gods Judgement Upc.. glish Rale in India' असे वर्णन केले गेले.

शिपायांचे बंड मानणारे विचारवंत


⋇ जॉन लॉरेन्स :
−  बंडाचे चे खरे मुळ लष्करातच होते. त्याचे मुळ कारण म्हणजे काडतूस प्रकरण होय.
⋇  सर जॉन सिले :
−  १८५७ चे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी.
⋇ जनरल कॅम्पबेल :
−  हे शिपायांचे निर्भेळ बंड होते. ते सुध्दा बेंगाल आर्मितील भारतीय शिपायांचे बंड होते. कामगारांनी संप करावा अशातला हा प्रकार होता.
⋇ पी.ई. रॉबर्ट्स:
−  १८५७ च्या बंडात स्वार्थी उद्दीष्टांची परिपुर्ती करू इच्छिणारे अनेक हितसंबंधी लोक सामिल झाले होते.
⋇ किशोरचंद्र मिश्रा :
−  हे बंड लष्करी बंडाचा स्वरूपाचे होते. एक लाख शिपायांचे बंड होते. जनतेच्या सहभागाचा त्याच्याशी संबंध नाही.
⋇  डॉ.आर.सी. मुजुमदार:
−  १८५७ चे बंड राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती. बंडाचे नेते हे राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले नव्हते.
⋇ थॉमस व गॅरेट :
−  हे खरोखरच स्वातंत्र्य युध्द बनते की काय अशी भिती वाटत होती. तसे झाले असते तर इंग्रजांना हिन्दुस्थान पुन्हा जिंकणे अशक्य होते.
⋇ टी.आर. होल्मस :
−  १८५७ चा उठाव म्हणजे 'सुसंस्कृतपणा व रानटीपणा' यातील झगडा होय.

टिप्पण्या