उत्तर भारतातील उठाव
− मिरत- १० मे १८५७ ९ मे १८५७ रोजी मिरत येथील तिसऱ्या घोडदळाच्या रेजिमेंटमधील ८५ शिपायांनी चरबी युक्त काडतुसे वापरण्यास नकार दिल्याने लष्करी हुकुमाचा भंग केल्याच्या कारणावरून सर्वांना १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
− १० मे १८५७ रोजी मिरत येथील सैनिकांनी उठाव करून ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
− ११ मे १८५७ रोजी क्रांतिकारक मिरतहून ३० मैलांवर असलेल्या दिल्ली या ठिकाणी पोहोचले.
− मे. या दिवशी सकाळी भारतीय शिपाई दिल्लीला पोहचले 'फिरंग्यांशी बंड करून आम्ही मिरतहून येथे आलो आहोत. यापुढे आम्हाला आज्ञा द्यावी व पदरी पाडावे' असे बहादूरशहाला म्हटले.
⋇ दिल्ली येथील उठाव :-११ मे १८५७
− दिल्ली हे क्रांतिकारकांचे १८५७ च्या उठावाचे मुख्य केंद्र होते.
− दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व बहादूरशहा जफर दुसरा व त्याचा सेनापती बख्तखान यांनी केले.
− क्रांतिकारकांनी बहादूरशहा जफर दुसरा यास ११ मे १८५७ रोजी दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले.
− बहादूरशहाला दिल्लीच्या गादीवर बसवून त्या ‘बादशहा' व 'गाझी असे किताब देण्यात आले.
− १५ सप्टेंबर १८५७ रोजी ब्रिटिश अधिकारी विल्यम हडसन याने बंड मोडून दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली.
− ब्रिटिश फौजेतील पंजाबी, शिख, गुरखा या शिपायांच्या जोरावर दिल्लीतील बंड मोडून काढले.
− बहादूरशहा जफर यास दिल्लीमध्ये न ठेवता ब्रह्मदेशातील 'रंगून' च्या तुरूंगात ठेवले व तेथे त्याचा ७ नोव्हेंबर १८६२ रोजी मृत्यू झाला.
− ब्रिटिशांचे क्रौर्य एवढ्यावरच न थांबता त्यांनी राजवाड्यामध्ये प्रवेश करून बहादूरशहा जफर च्या २१ निरअपराध पुत्रांची गोळ्या झाडून हत्त्या केली.
⋇ लखनौ येथील उठाव : ३० मे १८५७
− ३० मे १८५७ रोजी अयोध्याच्या (अवध) लखनौ या राजधानीत उठावाला सुरूवात झाली.
− लखनौ चे नेतृत्व बेगम हजरत महल हिने आपला अल्पवयीन मुलगा कादीर यास लखनौच्या गादीवर बसवून केले.
− ब्रिटिशांनी औट्रम व हॅवलॉक' या सेनापतींच्या कर्तृत्वामुळे २२ मार्च १८५८ रोजी लखनौमधील उठाव मोडून काढला.
− राणी बेगम हजरत महल पळून जाऊन औंधच्या (नेपाळ) प्रदेशात पोहोंचली.
⋇ कानपूरचा उठाव : ५ जून १८५७
− कानूपर या शहराचा विकास कंपनीच्या काळातच झाला होता.
− कानपूर पासून जवळ असलेल्या 'ब्रम्हवर्त' या ठिकाणी पदच्यूत पेशवा दुसरा बाजीराव' यांचे निवासस्थान होते.
− दुसरा बाजीराव च्या मृत्यूनंतर दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यास राज्याधिकार देण्यास ब्रिटिश राज्यकर्त्यांनी नाकारला होता. त्यामुळे नानासाहेबांच्या मनात सुडाची भावना होती. त्याला संधी मिळाली १८५७ च्या रूपाने. कानपूरमध्ये ‘बिठूर' (ब्रम्हवर्त) हे क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते.
− ५ जून १८५७ रोजी कानपूरमध्ये उठावास सुरूवात झाली. कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती तात्या टोपे (रामचंद्र पांडुरंग टोपे) यांनी केले.
− १ जुलै १८५७ रोजी कानपूरात नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनी राज्य नष्ट झाल्याचा फतवा 'हिंदी व उर्दू भाषेतून काढण्यात आला.
− तात्या टोपे या नानासाहेबांच्या सेनापतीने गनिमी काव्याने इंग्रजांशी लढा दिला पण जनरल कॅम्पबेल या इंग्रज सेनापतीने तात्यांचा पराभव केला.
− १७ जुलै १८५७ रोजी इंग्रजांनी नानासाहेबांचा पराभव केला व नानासाहेब पेशवे औंध (नेपाळ) च्या प्रदेशात पळून गेले.
⋇ झाशीचा उठाव : ५ जून १८५७
− लॉर्ड डलहौसीने झाशी संस्थान खालसा करण्याच्या निर्णय घेऊन तसा जाहीरनामाही सादर केला व तशा अर्थाचा सरकारी खलिता “एलिस' मार्फत लक्ष्मीबाई कडे पाठविला.
− एलिस वाचत असलेला खलिता ऐकून पडद्याआड वसलेल्या लक्ष्मीबाईचा भ्रमनिरास झाला व तिच्या तोंडातून द्वेषाने उद्गार बाहेर पडले ‘मेरी झांशी नही दूंगी'!
− ५ जून १८५७ रोजी झाशीत उठावास सुरूवात झाली. झाशी येथील उठावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई उर्फ ‘मणुकर्णिका' यांनी केले.
− झाशी येथे राणी लक्ष्मीबाईने स्वातंत्र्यनिदर्शक जाहीरनामा काढून त्यात
हुकूमत राणी लक्ष्मीबाई की ।।
असे स्पष्ट केले होते.
− ५ एप्रिल १८५८ रोजी सर ह्यू रोजने झाशीवर आक्रमण केल्याने राणी लक्ष्मीबाई पळून जाऊन काल्पी येथे पोहोचली.
− काल्पीला ह्यू रोज याने राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे यांच्याशी युध्द केले व या युध्दात पराभूत होवून लक्ष्मीबाई व तात्या टोपे ग्वाल्हेरला आले.
− ग्वाल्हेरचा राजा जयाजीराव शिंदे हा आग्राला निघून गेला.
− १ जून १८५८ रोजी तात्या टोपे व राणी लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर जिंकले.
− १७ जून १८५८ ला सर ह्यू रोज बरोबरच्या लढाईत २३ वर्षीय राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेरच्या लढाईत धारातिर्थी पडली.
− २० जून १८५८ रोजी इंग्रजांनी झाशी व ग्वाल्हेर ताब्यात घेतले. तात्या टोपे यांना पकडून १८ एप्रिल १८५९ रोजी क्षिप्री (शिवपूरी) येथे फाशी देण्यात आली.
⋇ सर ह्यू रोज :-
− Albest of the Rebel Leaders 'बंडवाल्याकडचे सर्वात समर्थ नेतृत्व' असे उद्गार सर ह्यू रोजने राणी लक्ष्मीबाई बद्दल काढले.
⋇ स्वा. सावरकर
− १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील अग्निकल्लोळाची शेवटची जन असली एक विभूती राष्ट्राच्या अस्मितेला सफलता देते.
जातीने स्त्री, वयाने पंचविशीच्यात आत
रूपाने खुबसुरत, वर्तनाने मनमोहक,
आचरणाने सच्छिल, प्रजेची प्रिती तीनी जाज्वल्य ज्वाला,
स्वातंत्र्यांची स्वतंत्रा !
मानाची माननीयता, रणाची रणलक्ष्मी!"
राणी लक्ष्मीबाई आमची आहे हे म्हणण्याचा मान मिळणे परम 'दुष्कर' आहे.
⋇ जगदिशपूरचा उठाव : २० जुलै १८५७
− बिहारमधील जगदीशपूर या गावी 'कुंवरसिंह' या राजपूत जमिनदाराची जहागिरी होती.
− जगदीशपूरचा ८० वर्षाचा वृध्द जमिनदार ‘राणा कुंवरसिंह' याने बिहारमधील दानापूर छावणीतील क्रांतीकारकांचे नेतृत्व केले.
− २० जुलै १८५७ रोजी बिहारमधील ‘आरा' येथील तुरूंगातील कैद्यांना मोकळे करून उठावास सुरूवात झाली.
− सेनापती डग्लसने केलेल्या हल्ल्यात राणा कुंवरसिंहाचा ९ मे १८५८ रोजी मृत्यू झाला. त्याचा भाऊ अमरसिंह याने युध्द पुढे चालू ठेवले व तोही ऑक्टोबर १८५८ मध्ये पकडला गेला.
− उत्तर प्रदेशातील बनारस व अलाहाबाद प्रदेशात ४ जून १८५७ रोजी उठाव झाला. पण ‘कर्नल निल' या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या गोऱ्या व शीख लोकांच्या साहाय्याने हा उठाव मोडून काढला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा