⋇ बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील 'चुआर' आणि 'हो' यांचे बंड :
−  दुष्काळ, वाढलेला भूमिकर आणि आर्थिक संकटांमुळे मिदनापूर जिल्ह्यातील आदिवासी असलेल्या चुआरांनी बंड पुकारले.
−  दलभूम, कैलापाल, ढोल्का व बारामभूम येथील राजांनी एकत्र येऊन १७६८ मध्ये बंड केले.
−  छोटा नागपूर आणि सिंहभूम जिल्ह्यातील 'हो' लोकांनीही बंड केले.
⋇ 'छोटा नागपूर' भागातील १८२७ चा ‘कोलामांचा उठाव'
⋇ 'आसाम' मधील 'अहोमांचे बंड' : १८२३-१८२८
⋇ 'मलबार' (केरळ) मधील १८२१ चा ‘मोपला शेतकऱ्यांचे' बंड
⋇ आंध्र प्रदेशातील पाळेगारांचा उठाव
⋇ उत्तर भारतातील जाटांचे-राजपुतांचे व बुंदेल्यांचे बंड :
⋇ उत्तर बंगालमधील पागलपंथी व फरेजी अनुयायांचे बंड :
⋇ वेल्लोर बंड - १८०६
−  भारतीय सैनिकांनी १८०६ मध्ये मद्रास प्रांतातील 'वेल्लोर' येथे मोठा उठाव केला.
−  इंग्रजांविरूध्द त्यांच्याच सेनेतील भारतीय सैनिकांचा हा पहिला मोठा उठाव होता.
−  १८२४ मध्ये बराकपूर छावणीतील भारतीय शिपायांनी असाच उठावाचा प्रयत्न केला होता.
⋇ कोळ्यांचा उठाव :
−  पूणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोळी लोकांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केला.
−  १८२८, १८३९, १८४४ व १८४८ मध्ये कोळ्यांनी उठाव केले. या उठावाचे नेतृत्व भाऊ खेर, चिमणाजी जाधव, नाना दरबारे यांनी केले. हे पेशव्यांचे अधिकारी होते.
⋇ रामोशांचे बंड :
−  रामोशी ही पश्चिम घाटात राहणारी एक प्राचीन जमात आहे
⋇ पूणे जिल्ह्यातील रामोशांचे बंड : −  पुरंदरचे उमाजी नाईक आणि सासवडचे सत्तु नाईक हे रामोशांचे प्रसिध्द म्होरके व लुटीच्या कामात महाअट्टल होते.
−  १८४४ मध्ये नाशिक-अहमदनगर भागात रामोशांनी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला. या भागातील रामोशांचे नेतृत्व राधु आंग्रे यांनी केले.
−  चितुरसिंग नाईक हा सातारा जिल्ह्यातील रामोशांचा नेता होता.
−  चितुरसिंग नाईक च्या नेतृत्वाखाली सातारा, वाई, भोर व कोल्हापूर परिसरात इंग्रजांविरूध्द उठाव केले.
−  उमाजी नाईक हा रामोशी ब्रिटिशांना विरोध करणारा पहिला शुरविर ठरतो

१८५७ च्या उठावाची कारणे:


१) राजकीय कारणे :
 i) कंपनीचे साम्राज्यवादी धोरण :-
−  ब्रिटिश केवळ व्यापारासाठी भारतात आले होते. व्यापाराच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळविणे हा त्यांचा मुळ उद्देश होता.
−  भारतातील राजकीय अस्थिरता व आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन कंपनीने भारतीय राज्याच्या राज्यकारभारात हस्तक्षेप सुरू करून सत्ता विस्ताराला प्रारंभ केला.
−  ब्रिटिशांनी लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड हेस्टिंग्ज व लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरल यांच्या कारकिर्दीत विस्तार केला.
 ii) तैनाती फौजेचे दुष्परिणाम:
−  लॉर्ड वेलस्लीने लष्करीदृष्ट्या कमकुवत असलेल्या संस्थानांना तैनाती फौजेची पध्दत लागू करून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले.
 iii) डलहौसीचे संस्थाने खालसा धोरण :
−  लॉर्ड डलहौसीने साम्राज्यवादी आक्रमक धोरण अवलंबून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव भारतातील स्थानिक राज्ये खालसा करून ब्रिटिश साम्राज्यास जोडून टाकली.
 iv) दत्तक वारसा नामंजूर :
−  निःसंतान राजाला आपला उत्तराधिकारी म्हणून घेण्याची आज्ञा दिली नाही.
−  निपुत्रिक राजाला दत्तक पुत्र घेण्याची कंपनी सरकारने मंजुरीची अट १८४४ मध्येच घातली होती.
−  परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नव्हती. डलहौसीने याचाच फायदा घेऊन सातारा, जैतपूर-संभलपूर, बहागत, उदयपूर, झाशी इत्यादी संस्थाने खालसा केली.
 v) पदव्या, तनखे बंद केले :
−  राजेरजवाड्यांना पदव्या व तनखे इंग्रज सरकारने दिले होते ते वंशपरंपरागत नसल्याच्या कारणावरून डलहौसीने बंद केले.
−  पदव्या काढून घेतल्या यामध्ये दत्तकपुत्र नानासाहेब पेशवाही होता.
−  डलहौसीच्या या धोरणामुळे संस्थानिक, जहागिरदार, वतनदार संतप्त झाले.
 २) सामाजिक कारणे :
−  ब्रिटिश लोक हे स्वतःला भारतीयापेक्षा उच्च समजत होते.
−  केवळ आपलीच संस्कृती श्रेष्ठ माणून भारतीय संस्कृतीला व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले.
−  सतीबंदी कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा हे कायदे परंपरागत भारतीय समाजाला आपल्या संस्कृतीवरीलआक्रमण वाटले.
 ३) धार्मिक कारणे :
−  १८०६ मध्ये लष्कराच्या मद्रास छावणीतील शिपायांना गंध लावण्यास व दाढी वाढवण्यास बंदी घातली.
−  १८१३ च्या कायद्याने इंग्लडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात येण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले.
−  सती प्रतिबंधक कायदा, विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंधक कायदा यासारख्या सामाजिक सुधारणा म्हणजेच भारतीय संस्कृती व धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न आहे अशी भावना भारतीयांमध्ये निर्माण झाली.
−  १८४२ साली ब्रह्मदेशाच्या युध्दात हिंदू शिपायांना सक्तीने पाठविण्यात आले.
 ४) आर्थिक कारणे :
−  कंपनीने भारतात राज्य स्थापन केल्यानंतर आर्थिक शोषण करण्यावरच आपले लक्ष केंद्रीत केले होते.
−  भारतातून कच्चा माल इंग्लडला घेवून जाणे व त्यावर आधारित पक्का माल तयार करून भारतात आणून विकणे. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे नष्ट झाले.
−  हस्त व्यवसायांचा -हास झाला. शेतकरी वर्गात रयतवारी, महालवारी, कायमधारा इ. सदोष महसूल पध्दतीमुळे असंतोष पसरला.
 ५) लष्करी कारणे :
−  ब्रिटिश लष्करातील हिंदी शिपायांचे वेतन युरोपियन शिपायांच्या तुलनेत फार कमी होते.
−  तसेच युरोपियन शिपायांना लवकर बढती मिळत होती.
−  भारतीय शिपायांना गंध लावण्यास व दाढी वाढविण्यास बंदी घातली.
−  भारतीय सैन्य हे नेहमी युध्दात समोर असायचे.
 ६) तात्कालिन कारणे :

i)काडतूस प्रकरण
−  ब्रिटिश लष्करात असलेल्या रॉयल एन्फिल्ड रायफलीच्या काडतूसांना गाईची व डूकराची चरबीचे आवरण असत.
−  काडतूसाचा वरचा भाग तोंडाने कापून काढावा लागत होता.
−  गाय हिंदूना पवित्र व डूक्कर मुस्लिमांना निषिध्द असल्याने भारतीय शिपायांनी ही काडतूसे वापरण्यास नकार दिला.
⋇ १८५७ चा उठाव :
−  ३१ मे १८५७ ही उठावाची पूर्वनियोजित तारिख होती.
−  १८५७ च्या उठावात क्रांतीचे प्रतिक ‘लाल कमळाचे फुल' व 'चपाती' होते.
−  १८५७ च्या उठावाचा प्रसिध्द नारा 'चलो दिल्ली' होता.
−  २९ मार्च १८५७ रोजी बराकपूर छावणीत मंगल पांडे या भारतीय शिपायाने मेजर ह्यूसन या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली. तारखेपुर्वीस उठावाला सुरूवात केली. परिणामी ३४ वी.एन.आय. रेजिमेंट भंग करण्यात आली.
−  चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर करण्यास नकार देणाऱ्या सैनिकांवर शिस्तभंगाचा आरोप ठेवून शिक्षा देण्यात आली.
−  ८ एप्रिल १८५७ रोजी मंगल पांडेस फाशी देण्यात आली.
−  १८५७ च्या उठावातील मंगल पांडे हा पहिला हुतात्मा ठरला.

टिप्पण्या