तीन गोलमेज परिषद
− सविनय कायदेभंगाची चळवळ चालू असतांनाच सायमन कमिशनने आपला अहवाल २७ मे १९३० रोजी जाहीर केला.
− सायमन कमिशनच्या अहवालातील शिफारशीचा विचार करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदांचे आयोजन केले.
⋇ पहिली गोलमेज परिषद : नोव्हेंबर १९३० - जानेवारी १९३१
− पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर १९३० मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनॉल्ड यांच्या अध्यक्षतेखाली भरली.
− या पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी केले.
− पहिल्या गोलमेज परिषदेत ८९ प्रतिनिधी हजर होते. त्यामध्ये ,
५७ − सरकार नियुक्त
१६ − संस्थानिकाचे
१६ − भारतातील राजकीय संघटनांचे प्रतिनिधी होते.
⋇ मुस्लिम लीग:
− मौलाना मोहम्मद अली जोहर, मोहम्मद शफी, आगाखान, मोहम्मद अली जीना, मोहम्मद जफरूल्ला खान, ए.के. फकरुल हक
⋇ हिंदू महासभा:
− बी.एस. मुंजे
− बॅ. एम.आर. जयकर
⋇ उदारमतवादी:
− तेजबहादूर सप्रू
− श्रीनिवास शास्त्री
− सी.वाय. चिंतामणी
⋇ शीख:
− सरदार उज्वलसिंह
⋇ कॅथेलिक (इसाई)
− ए.टी. पन्नीरसेल्वम
⋇ दलित नेते:
− डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⋇ संस्थानिक:
| − हैद्राबादचा दिवाण | − अकबर हैदरी |
| − म्हैसूरचा दिवाण | − सर मिर्जा ईस्माईल |
| − ग्वाल्हेरचे | − कैलास नारायण हक्सर |
| − पटियालाचे | − महाराजा भूपेंदर सिंह |
| − बडोदयाचे | − सयाजीराव गायकवाड |
| − जम्मू काश्मिरचे | − महाराज हरिसिंह |
| − बिकानेर | − महाराज गंगासिंग |
| − भोपाल | − नवाब हमिदुल्ला खान |
| − नवानगर | − के.के. एस. रणांजतसिंगजी अलवर |
| − अलवर | − महाराज जयसिंग प्रभाकर |
− राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेत भाग न घेतल्याने परिषदेत घेतलेले निर्णय अर्थहीन ठरतील असे मत परिषदेत उपस्थित असलेल्या तेजबहादूर सप्रू, व्ही.एस. शास्त्री, बॅ.एम.आर. जयकर यांच्या सहित बहुतेक प्रतिनिधींनी केले.
⋇ गांधी आयर्विन करार / दिल्ली करार : ५ मार्च १९३१
− या करारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मान्य करतांना तडजोडी मांडल्या.
− कायदेभंगाच्या सत्याग्रहींची तुरूंगातून सुटका करण्यात यावी.
− सरकारने सर्व वटहुकुम मागे घ्यावेत.
− सत्याग्रहींची जप्त केलेली मालमत्ता सरकारने परत करावी.
− दारु, अफू व परदेशी कापड यांच्या दुकानापुढे विरोधने करण्यास परवानगी द्यावी.
− समुद्र काठच्या लोकांना मीठ तयार करण्याची परवानगी द्यावी व मीठावरील कर रद्द करावा.
− मार्च १९३१ च्या कराची अधिवेशनात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गांधी-आयर्विन करारास मान्यता दिली.
− या कराची अधिवेशनातच ‘मुलभूत हक्कांचा ठराव' व 'राष्ट्रीय आर्थिक' कार्यक्रमावरील ठराव संमत करण्यात आला.
⋇ दुसरी गोलमेज परिषद : सप्टेंबर १९३१− डिसेंबर १९३१
− गांधी आयर्विन करारानुसार राष्ट्रीय सभेच्यावतीने महात्मा गांधीजी हे एकमेव प्रतिनिधी म्हणून सरोजिनी नायडू यांच्यासोबत परिषदेत हजर होते.
− पंडित मदनमोहन मालवीय, घनश्यामदास बिरला, मोहम्मद इकबाल, सर मिर्जा इस्माईल, एस.के. दत्ता, सर सय्यद अली ईमाम इ. सदस्य उपस्थित होते.
− ब्रिटिश संसदेतील हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांनी भारतीय जनतेचे एकमेव प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजींचा कडवा विरोध केला.
− महात्मा गांधीजींनी भारताला त्वरित संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.
− अल्पसंख्यांकांना प्रतिनिधीत्व देण्याच्या प्रश्नावर या परिषदेत एकमत होऊ शकले नाही.
− संपूर्ण स्वराज्याची मागणी फेटाळल्यामुळे गांधीजी डिसेंबर १९३१ मध्ये भारतात परतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा