⋇ १९२९ चे लाहोर अधिवेशन :
−  १९२९ लाहोर अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
−  वसाहतीच्या स्वराज्याची मागणीची एका वर्षाची मुदत ब्रिटिश सरकारने न पाळल्याने लाहोर अधिवेशनात 'संपूर्ण स्वराज्याची' मागणी करणारा ठराव पास केला गेला.
−  लाहारे अधिवेशनातच 'सविनय कायदेभंग' चळवळीचा ठराव मंजूर करण्यात आला.
−  ३१ डिसेंबर १९२९ पर्यंत ब्रिटिश सरकारने भारताला वसाहतीचे स्वराज्य दिले नाही तर कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा इशारा दिला.
−  २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर जवळ असलेल्या रावी नदीकाठी तिरंगा फडकवून हजारो भारतीयांनी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली. आणि सभेच्या शेवटी'वंदेमातरम' हे राष्ट्रीय गीत म्हणण्यात आले.
−  २६ जानेवारी १९३० भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात आला.

सविनय कायदेभंगाची चळवळ : १९३०


−  महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारशी तडजोडीचे ११ मुद्दे जाहीर केले.
−  त्यामध्ये संपूर्ण दारूबंदी, ५०% शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, ५० % लष्करी खर्चात कपात, देशी मालास संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता इ. अटींचा समावेश होता.
−  ब्रिटिश सरकारने या मुद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे १४ फेब्रुवारी १९३० मध्ये म. गांधीजींनी भारतीय जनतेस सविनय कायदेभंगाचा आदेश दिला.
⋇  दांडी यात्रा :−  १२ मार्च १९३०
−  १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधीजीनी ७८ निष्ठावान अनुयायासह गुजरात मधील साबरमती आश्रमातून ३८५ कि.मी. अंतर पार करून दांडी येथे प्रयाण केले.
−  दांडी यात्रेमध्ये १३ महाराष्ट्रीयन व्यक्ती होते. त्यामध्ये पंडीत खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरकरे, अवंतिकाबाई गोखले, जमनलाल बजाज, बाळासाहेब द.ना. बांदेकर, स.का. पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हाणी इ. महाराष्ट्रीयन व्यक्तीचा समावेश होता.
−  नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना ‘नेपोलियन एल्बवरून पॅरिसकडे गेला' या घटनेशी केली.
−  ५ एप्रिल १९३० रोजी २४ दिवसात गांधीजी दांडी येथे पोहोचले.
−  ६ एप्रिल १९३०रोजी दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला व कायदेभंग चळवळीस प्रारंभ केला.
−  महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, ओरिसा, चेन्नई इ. ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्यात आला.
−  भारतात ज्या ठिकाणी समुद्रकिनारा नव्हता त्या ठिकाणी अन्यायकारक कायद्यांचा भंग करण्यात आला.
−  महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात बिळाशी येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला.
−  भारतात जंगल सत्याग्रहाची संख्या ७० हजारावर होती. साताऱ्यातील बिळाशी या ठिकाणी राजूताई कदम या महिलेला पोलिसांचा मार खावा लागला.
−  पुसद जवळच्या आरक्षित जंगलात १० जुलै १९३० ला गवत कापून बापूजी आणे यांच्या नेतृत्वाखाली ११ स्वयंसेवकांनी जंगल सत्याग्रह केला.
−  कमलादेवी चट्टोपाध्याय, उर्मिला देवी, सरोजिनी नायडू, कमला नेहरू, हेमप्रभादास, अवंतिकाबाई गोखले, राजूताई कदम, सुचेता कृपलानी इ. महिलांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
−  वंतिकाबाई गोखले मुंबईतील एका हायस्कूल मध्ये शिक्षिका होत्या त्या सतत खादीचा प्रचार करत.
−  हंसाबेन मेहता यांनी ऑनररी मॅजिस्ट्रेटपदाचा त्याग करून चळवळीत प्रवेश घेतला.
−  बंगालमध्ये उर्मिला देवी व इतर महिलांनी 'नारी सत्याग्रह समिती' स्थापन केली व तिच्या मार्फत सत्याग्रह केला.
−  प. नेहरु यांच्या मातोश्री स्वरुपराणी नेहरु व पत्नी कमला नेहरु यांनी कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
⋇ खुदा - ई - खिदमतगार :
−  २३ एप्रिल १९३० रोजी वायव्य सरहद्द प्रांतात म्हणजेच पेशावरमध्ये । 'खुदा - ई - खिदमतगार' या संघटनेने सविनय कायदेभंगाच्या चळवळीस सुरूवात केली.
−  वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान यांनी 'खुदा - ई - खिदमतगार' ही अहिंसक सत्याग्रहाची फौज तयार केली होती.
−  'खुदा - ई - खिदमतगार' म्हणजे आत्म्याचे किंवा देवाचे सेवक होय.
−  खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. खान अब्दुल गफार खान हे मौलाना अबुल कलाम आझाद व त्याच्या अल हिलाल' या वृत्तपत्रातील विचारांच्या प्रभाव पडल्यामुळे ते राष्ट्रीय सभेच्या कार्याकडे आकृष्ट झाले.
−  परकीय साम्राज्यापासून भारताला मुक्त करणे आणि गरीब जनतेस अन्न व वस्त्र मिळवून देणे या उद्दिष्टासाठी खुदा - ई - खिदमतगार संघटनेने कार्य करावे असे खान अब्दुल गफार खान आपल्या अनुयायाना सांगत असे.
−  सविनय कायदेभंगाच्या चळवळीत या संघटनेला 'लाल डगलेवाले' म्हणून ओळखले जात होते.
−  चंद्रासिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘गढवाल रेजिमेंट' मधील सैनिकांनी या सत्याग्रहावर गोळी झाडण्यात नकार दिला.
−  महाराष्ट्रात वडाळा येथे १७ मे १९३० रोजी तर कर्नाटकात सानिकता येथे मिठाचा सत्याग्रह करण्यात आला.
−  रत्नागिरी शिरोडा येथेही मिठाचा सत्याग्रह करण्यात आला.
−  बंगाल व बिहार या ठिकाणी चौकीदाराविरूध्द आंदोलन करण्यात आले.
−  गुजरातमधील खेडा, बार्डोली, जंबूसार, भरूच या ठिकाणी साराबंदीची चळवळ करण्यात आली.
⋇ धारासना (गुजरात):
−  ४ मे १९३० रोजी गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथे २१ मे १९३० रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली गांधीजींचे सहकारी इमाम साहब आणि गांधीजींचे चिरंजीव मणिलाल यांच्यासह २००० स्वयंसेवकांनी धारासना मीठ कारखान्यावर सत्याग्रह केला.
⋇ सोलापूर येथील गिरणी कामगारांचा संप:
− ७ मे १९३० रोजी सोलापूर मधील गिरणी कामगारांनी संप करून गिरणी कामगारांचा जमाव ब्रिटिशांचे दारूअड्डे उध्वस्त करून मंगळवार पेठेतील मुख्य पोलीस चौकीकडे वळला व पोलीस चौकीला आग लावली. त्यामध्ये २ पोलीस मृत्यूमुखी पडले.
−  सोलापूर येथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व्हाईसराय लॉर्ड आयर्विन याने भारतमंत्री बेजबूड यांच्या सहकार्याने १५ मे १९३० रोजी वटहुकूम काढला व संपूर्ण भारतात फक्त सोलापूर येथे लष्करी कायदा लागू केला.
−  सोलापूर मधील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कलेक्टर श्री नाईट यांनी रेल्वे बटालियनच्या सशस्त्र पोलिसांना पाचारण केले कर्नल पेज यांची सोलापूरात लष्करी कायदा प्रशासक म्हणून नेमणूक झाली होती.
−  लष्करी कायद्याच्या वेळी सोलापूरात चार आण्याच्या गांधी टोपीसाठी जीवाची बाजी लावणारा तरुण देशभक्त म्हणून तुळशीदास जाधव यांचा महाराष्ट्राला परिचय झाला.
−  पोलीसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या कारणावरून मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगननाथ शिंदे आणि किशन सारडा यांना पकडून १२ जानेवारी १९३१ रोजी 'येरवडा' तुरूंगात फाशी देण्यात आली.
−  सोलापूरमध्ये १२ जानेवारी हा दिवस 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो
−  बाबू गेनू याने स्वदेशीचा पुरस्कार म्हणून मुंबई शहरात 'वाळवा देवीच्या नवीन हनुमान' रस्त्यावर परदेशी कापडाच्या भरलेल्या ट्रकसमोर १२ डिसेंबर १९३० रोजी बलिदान केले.

टिप्पण्या