⋇  वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ : १७ ऑक्टोबर १९४०
−  ब्रिटिशांना युद्ध प्रयत्नात अडथळे निर्माण करू नयेत म्हणून काँग्रेसने महात्मा गांधीजींच्या निर्णयाखाली वैयक्तिक सत्याग्रहाचा निर्णय घेतला.
−  वैयक्तिक सत्याग्रह याचा अर्थ म. गांधीजी सांगतील त्या स्वयंसेवकाने एकट्याने इंग्रजांचा कायदा मोडावा व इंग्रज देतील ती शिक्षा स्विकारावी.
−  मुंबईतील काँग्रेस समितीच्या बैठकीत वैयक्तिक सत्याग्रहाच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली.
−  महात्मा गांधीजींच्या आदेशावरून प्रथम विनोबा भावेंनी भाषण बंदीचा कायदा मोडला व त्यांना ६ महिन्यांची शिक्षा झाली.
−  दुसरे वैयक्तिक सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरे वैयक्तिक सत्याग्रही सरदार वल्लभभाई पटेल व चौथे वैयक्तिक सत्याग्रही मौलाना आझाद होते.
−  मे १९४१− १९४२ पर्यंत चाललेल्या या लढ्यात २५,००० च्या वर वैयक्तिक सत्याग्रही सहभागी झाले होते.

क्रिप्स योजना : मार्च १९४२


−  ब्रिटिश सरकारने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली २९ मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर केली.
प्रमुख तरतुदी :
−  भारतात संघराज्याची त्वरित निर्मिती करून वसाहतीचे स्वराज्य देण्यात येईल.
−  युद्ध समाप्तीनंतर घटनानिर्मितीसाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली.
−  प्रांतांना व संस्थानिकांना नवीन संघराज्यात सामिल होण्यास अथवा न होण्यासंबंधी स्वंयनिर्णयाचा अधिकार देण्यात येईल.
⋇  क्रिप्स योजनेचे परिणाम :
−  प्रांतांना व संस्थानिकांना स्वंयनिर्णयाचा अधिकार देऊन अप्रत्यक्षपणे फुटीची बीजे पेरल्याने महात्मा गांधीजींनी व राष्ट्रीय सभेने क्रिप्स योजना फेटाळली.
−  बॅ. जीना व मुस्लिम लीग यांनी क्रिप्स योजनेत पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख नसल्याने क्रिप्स योजना फेटाळली.
−  हिंदू महासभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिख नेते यांनी ही क्रिप्स योजना फेटाळली.
−  'बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश' अशा शब्दात गांधीजींनी क्रिप्स योजनेची संभावना केली.

चलेजाव चळवळ/छोडो भारत १९४२


−  चलेजाव चळवळ 'ऑगस्ट क्रांती' या नावानेही प्रसिद्ध आहे.
−  १४ जुलै १९४२ मध्ये वर्धा येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारणीने चलेजाव चळवळीचा प्रस्ताव मान्य केला.
−  ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधीजींनी भारतीय जनतेस ‘करा किंवा मरा' हा संदेश देऊन ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे सांगितले.
−  ९ ऑगस्ट १९४२ च्या सकाळी, सरकारने महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, मिरा बेन, राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, असफ अली, गोविंद वल्लभपंत यांच्यासह १४८ महत्त्वाच्या नेत्यांना अटक करून अज्ञात स्थळी डांबून ठेवले.
−  महात्मा गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. तर राजेंद्रप्रसाद यांना पाटण्यात कैद करण्यात आले.
−  पंडित जवाहरलाल नेहरूसहित इतर नेत्यांना अहमदनगर च्या तुरूंगात कैद करण्यात आले.
−  प्रमुख नेत्यांना अटक होवून सुद्धा भारतीय जनतेने न डगमगता चले जाव आंदोलनाची दिशा स्वतः ठरवली.
−  चलेजाव चळवळीच्या काळात राष्ट्रीय सभा ही बेकायदेशीर ठरविण्यात आली होती.
−  जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरूणा असफअली, युसूफ मेहरअली, सुचेता कृपलानी, एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, छोटूभाई पुरानिक, बीजू पटनाईक, आर.पी. गोयंका इ. नेत्यांनी चलेजाव चळवळ तीव्र केली. 'सेंट्रल डिरेक्ट्रोरेट' ही भूमिगताची मध्यवर्ती संस्था मुंबईत स्थापन करण्यात आली.
−  कु. उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी, चंद्रकांत बाबू जव्हेरी, यांनी मुंबईत सिक्रेट रेडिओ स्टेशन सुरू करून त्यामार्फत १९४२ च्या क्रांतीची प्रेरणा व संदेश भारतभर प्रसारित करण्याचे कार्य केले. नाना पुरोहित, मोहन धारिया यांनी रायगड जिल्ह्यात महाड येथे चले जाव चळवळ कार्यरत केली होती.
−  भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यात चलेजाव आंदोलन तीव्र केल्यामुळे भाई कोतवाल व त्यांचे सहकारी गोमाजी पाटील यांना पकडून देणाऱ्यास ५००० रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते.
−  सातारा जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी १९४२ मध्ये 'प्रति सरकार' स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्रात चळवळ जागृत केली.
−  चलेजाव चळवळीत नंदूरबार जिल्ह्यात शिरीषकुमार व चार विद्यार्थी गोळीबारात ठार झाले.
−  कराचीत हेमू कलानी या तरुण विद्यार्थ्यास पोलिसांनी गोळ्या घालनू ठार केले.
−  बंगाल मधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व अजमगड, बिहार मधील भागलपूर व पुर्णिया या भागात ब्रिटिशांची हाकालपट्टी करून जनतेने प्रतिसरकारची स्थापना केली.
−  १९४२ च्या चले जाव चळवळीचा गोड शेवट १९४७ च्या स्वातंत्र्य प्राप्तीने झाला.
⋇  राजाजी योजना : चक्रवर्ती राजगोपालचारी मार्च− १९४४
−  चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी मार्च १९४४ मध्ये मुस्लिम लीगची राष्ट्रीय सभेशी तडजोड घडून आणावी म्हणून एक योजना म. गांधीसमोर मांडली.
−  गांधीजींनी ती योजना मान्य केली.
प्रमुख तरतुदी :
−  स्वतंत्र भारताची घटना निर्माण होण्यापुर्वीची व्यवस्था म्हणून राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांचे केंद्रीय हंगामी सरकार स्थापन करण्यात यावे.
−  युद्ध संपल्यानंतर मुस्लिम बहुसंख्यांक असलेल्या प्रांताच्या सीमा ठरवण्यासाठी समिती नेमावी.
−  या प्रांतात जनतेचे सार्वमत घेण्यात येवून त्या प्रांतातील लोकांना भारतात राहावयाचे की, स्वतंत्र पाकिस्तान ते ठरवावे.
−  सर्व पक्षांना या सार्वमताच्या वेळी प्रचार करण्याची समान संधी असेल.
−  संरक्षण, व्यापार व दळणवळण याविषयी दोन्ही राष्ट्रात आवश्यक करार करण्यात येतील.
−  जनतेच्या सार्वमताच्या मुद्यामुळे बॅ. जीनांनी राजाजी योजना फेटाळली.

टिप्पण्या